क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एवढ्यातील भारताच्या तीन कोचेस बद्दलः

१. ग्रेग चॅपेल: मार्च २००७ मधे.
At the moment he looks like trying to eke out a career built on a glittering array of stats. If he is playing for that reason and not to win as many matches as he can for India then he is wasting his time and should retire immediately.

नशीब आपण चॅपेललाच हाकलला नंतर. सचिन ने त्यानंतर ४० मॅचेस मधे १५ शतके मारली आहेत आणि किमान तीन मॅचेस मधे चौथ्या डावात नाबाद राहून भारताला जिन्कून दिले आहे. (सध्या हे गुरूजी पॉन्टिंग च्या मागे लागलेले दिसतात).

२. Tendulkar is the professor of batting

गॅरी कर्स्टन ला "गुरूजी" नक्की कोण आहे ते बरोबर माहीत आहे Happy

३. I didn't coach Tendulkar. I gave him gentle advice when he asked for it.

जॉन राईट ("इंडियन समर्स" मधून). परफेक्ट.

साहेबांची मस्त खेळी... त्याने स्कोर पण केला आणि विकेट पण टिकवली. काल धोनी सहावी विकेट पडल्यावर जे खेळला ते आधी कुणी खेळले असते तर पुढे येणाऱ्यांचा आत्मविश्वास तरी वाढला असता.. साहेबांना अशा आणखी एका साथीची गरज होती.

बाय द वे, ये रे ये रे पावसा हे गाणं इतक्या मनापसून कधीच म्हणावं वाटलं नव्हतं .. Proud

CENTURION वर ५०वी Test centuries ठोकल्याबद्दल साहेबांचे अभिनंदन!

>>> (सध्या हे गुरूजी पॉन्टिंग च्या मागे लागलेले दिसतात).

म्हणजे आता पाँटिंग जबरदस्त फॉर्ममध्ये येऊन धावांचा रतीब ओतणार

साहेबांचे शतशः अभिनंदन.

साहेब,

आता
१. ओडिआय मधे ५० शतके
२. टेस्ट मधे ४०१ धावा
३. पुन्हा एकदा विश्व विजेते पद. (जे तुमच्याच हातात आहे. सा. आ. मधे थोडक्यात राहिले होते)
येवढे बाकी आहे.
हे सर्व करालच.

२०,००० धावा तुम्हाला दम न लागल्यास कराच.
जमल्यास लंच च्या आधी शतक, चारशेच्या वर चेसिंग (टेस्ट व वन डे मधे) हे पण बघाच. आणि हो आणि दिवसात तीनशे पण चालेल.

आम्हा सर्वांतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

सचिनच्या नावावरचे आणखी काही विक्रम -
*"साहेब" या संज्ञेबद्दल असणारा अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासुनचा सर्वसाधारण राग
व तिटकारा धुवून काढणे;
*प्रत्येक शतकानंतर दिवंगत वडिलांबद्दल इतक्या श्रद्धेने, प्रेमाने व नम्रतेने बोलून
बाप-लेक या नात्याला उच्चतम पातळीवर नेणे;
*टीकेला तोंडाने नव्हे तर आपल्या कामावरील श्रद्धेने व प्रयत्नाने समर्पक उत्तर देण्याचा
मार्ग प्रकाशित करणे;
*नवोदित खेळाडूंच्या [सर्वच खेळातील व देशांतील ] तब्बल दोन पिढ्यांसमोर तपःश्चर्या व नम्रता
यांचा जिवंत आदर्श ठेवणे

*आपल्या प्रतिभा विलासाने व वागणुकीने लाखो जणाना वर्षानुवर्षें निखळ आनंद देत रहाणे [इथं त्याने
लताजींच्या विक्रमाची बरोबरी केली असावी, असा एक जाणता अंदाज आहे !].

हॉटेलच्या मेन्युकार्डावरून ऑर्डर द्यावी तशा साहेबांना रेकॉर्ड बुक बघून ऑर्डरी सुटतायत की.
लंचच्या आधी शतक? त्यासाठी आधी ओपनिंगला यावे लागेल नाहीतर पहिल्या षटकात दोन बळी द्यावे लागतील.
माझ्या पण दोन ऑर्डरी :
एका वर्षातल्या सर्वाधिक कसोटी धावा आणि सर्वाधिक कसोटी शतके यापुढे दुसरे कोणतेही नाव शोभून दिसत नाही.
सध्या कसोटी खेळत असलेल्यांपैकी सर्वाधिक धावसरासरी : आत्ता बहुधा फक्त संगकाराच पुढे आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अभिनंदन!

साहेबांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा! फलंदाजी बघून पोट भरलं.
धोणी सकारात्मक, फ्री खेळला तर सेहवाग ईतकाच प्रभावी ठरू शकतो याचा त्यालाही काल प्रत्यय आलाच असावा.

एकंदरीत नेमहेमीप्रमाणे एक दोन अपवाद वगळता बाकी फलंदाजी छान झाली. (रैना ला मामा बनवला, लक्षमण मात्रं फालतू चेंडू वर बाद झाला..) गोलंदाजीची आपली डोकेदुखी जुनी आहे. आफ्रिकेत ७ फलंदाज घेवून सामना जिंकता येत नाही आणि तळाच्या फलंदाजांना घेवून सामना वाचवताही येत नाही हे काही नव्याने प्रकाशात आलेले सत्त्य नव्हे. तेव्हा पुढील सामन्यांसाठी रैना ला बसवून त्याच्या जागी अजून एक गोलंदाज घ्यावा.
लक्षमण ला बसवले तरच पुजाराला संधी आहे.

पुढील प्रत्त्येक सामन्यात द. आफ्रीकेचे २० गडी बाद करता येत नाहीत तोपर्यंत आपण जिंकणे ही दूरची गोष्ट आहे. थोडक्यात क्रिकेट चे बेसिक्स!

<<पुढील प्रत्त्येक सामन्यात द. आफ्रीकेचे २० गडी बाद करता येत नाहीत तोपर्यंत आपण जिंकणे ही दूरची गोष्ट आहे. थोडक्यात क्रिकेट चे बेसिक्स!>> खरंय. आणि याचा दबाव कसलेल्या फलंदाजांवर पण पडतो, हेही लक्षात घ्यायला हवं. उदा. द्रविड,लक्ष्मण.Raahuul.JPG
चाळीस झाल्यावर हा राहूल अशी स्वतःची विकेट कां फेकतोय !!

एका वर्षात सर्वात जास्त धावा महंमद युसुफने २००६मध्ये काढल्या होत्या - १७८८ >>>

टण्या ही माहिती थोडी चुकीचा आहे. सर्वात जास्त धावा सचिननेच दोन्हीत (वन्डे आणि टेस्ट) मध्ये मिळून २००० धावांपेक्षा जास्त दोन वेळा तर १९०० + दोन वेळा काढल्या आहेत. माझ्या लेखातील तक्त्यामध्ये मी वर्गवारी दिली आहे. Happy

रैना ऐवजी पुजारा हवा!
उनाडकट किंवा इशांत ऐवजी झहिर आणि भज्जी ऐवजी ओझाला आणा. Happy

या बातमीत जरा आतिशयोक्ती आहे. क्रिकइन्फो मधले स्मिथ चे वाक्यः "I must be honest I was a bit surprised he made life so easy for us this morning. " पुढे क्रिकइन्फो नेच "On the final morning, with India's last two wickets needing 30 runs to avoid an innings defeat, Tendulkar didn't farm the strike. He exposed Sreesanth and, after his dismissal, Jaidev Unadkat to the fiery quicks, Dale Steyn and Morne Morkel. " असे लिहीले आहे (सिद्धार्थ मोंगा)

मी आजचे बरेचसे बॉल्स पाहिले. सचिन नेहमीपेक्षा काही वेगळे करत नव्हता. खेळ सुरू झाला तेव्हा रवी शास्त्री म्हणाला की त्याचा अ‍ॅप्रोच काय आहे बघायला पाहिजे. पण पूर्ण दिवस बाकी असल्याने तो बहुधा नेहमीसारखाच खेळेल.

म्हणजे यात काहीतरी असे आहे जे आपल्याला माहीत नाही. दुसरे म्हणजे सचिन च्या अ‍ॅप्रोच मागे काही स्वार्थीपणा वगैरे असेल अशी शंका घेण्याचे कारण नाही (तेथे एकाने सचिन आपले चौथ्या डावातील अ‍ॅव्हरेज वाढवण्यासाठी नाबाद राहू पाहात होता वगैरे मुक्ताफळे उधळली आहेत. ती सिरीयसली घ्यायचे कारण नाही, पण मुळात ही "तिसरी" इनिंग होती. यामुळे त्याच्या चौथ्या डावाच्या अ‍ॅव्हरेज मधे काहीच फरक पडला नसता).

पण हे मात्र खरे की बघताना आपल्याला प्रश्न पडतो की हा एकतर स्वतः धुलाई करून रन्स वाढवणे किंवा ओव्हर च्या तिसर्‍या चौथ्या बॉलवर एक रन काढून पुढच्या ओव्हर मधे स्वतःकडे स्ट्राईक राहील असे बघणे यातील काहीच का करत नाहीये. जाने. २००८ ची सिडने टेस्ट आम्ही पाहात असताना असाच प्रश्न पडला होता. "स्ट्राईक फार्मिंग" करणारे खेळाडू पहिले ३-४ बॉल्स शक्यतो २,४,६ असे रन्स काढायला बघतात आणि मग शेवटच्या एक दोन बॉल्स मधे एक रन काढायचा प्रयत्न करतात. सचिन ने आज हे केले नाही हे खरे.

त्याचबरोबर श्रीशांत व्यवस्थित खेळत होता हे ही खरे. पिच सपाट आहे, बॉल बर्‍यापैकी जुना होता. फक्त सकाळच्या वेळी जो बोलर्स ना फायदा मिळतो तो न मिळू देण्यासाठी अर्धा तास तरी त्याने स्वतः जास्त खेळणे आवश्यक होते.

हे सगळे आपल्या डोक्यातील विचार. टीम चा नक्की अ‍ॅप्रोच याबद्दल काय होता हे अजून कोणी सांगितलेले नाही. द आफ्रिकेला पुन्हा बॅटिंग करायला लावणे हा गोल नक्कीच असणार. सचिन ने ४-५ फोर्स मधे तो गोल गाठला असता.

थोडे अनाकलनीय आहे हे नक्की. पण त्यात वाईट उद्देश शोधणे हे ही बरोबर वाटत नाही. टीम मधे याबाबतीत काहीतरी अंडरस्टॅन्डिंग असणार जे आपल्याला माहीत नाही.

आपल्याकडच्या पेपरवाल्यांनी माल-मसाला टाकुन बातमी छापली आहे (किंवा त्यांना स्मिथचे विंग्रजी निट झेपले नसावे) असे दिसतय Happy

राईचा पर्वत करणारी मूर्ख लोकं आहेत ती. क्रिक इन्फोवर उलट सुलट लिहले आहे. लक्ष्मण आणि इशांत खेळताना जास्त चेंडू इशांत ने खेळले लक्ष्मणने नाही हे इतक्यात विसरेल गेले!! तेंव्हा मात्र लक्ष्मण कसा स्ट्राईक रोटेट करुन तळातल्या लोकांना देखील खेळायला भाग पाडत होता असे मिडियाने लिहले. सचिन आहे म्हणून हे उलटे ..

सचिनने काही केले असते तरी लोक बोललेच असते. Happy आय डोन्ट केअर सचिनने काय केले. रैनाने दोन्ही डावात का नाही खेळले? पहिल्या डावात फलंदाजी का ढेपाळली ह्याची चर्चा करायला पाहिजे.

सचिनने हाराकिरी करुनही धावा होणं शक्य होतं का ? सचिनलाच नव्हे तळाच्या फलंदाजानासुद्धा कमी प्रकाशातही १४४-१४५ च्या वेगाने शॉर्ट पिच चेंडूंचा सतत मारा करून बॅकफूटवर ठेवायचे तंत्र स्मिथने आदल्या दिवसापासून योजले होते. समालोचकही गोलंदाजीला "इंटिमिडेटरी" विशेषण लावतच होते. आदल्या दिवशी सचिनने आक्रमक पवित्रा घेऊन शेवटच्या क्षणी "डक" करायच्या प्रयत्नात असा एक चेंडू अंगावर घेतला होता व होतील तितक्या धावा करण्याच्या डेस्परेशनमध्ये हूक करायच्या प्रयत्नात थर्डमॅनकडे त्याचा झेलही उडाला होता. सचिनला स्ट्राईक ठेवायला द्यायचा नाही यासाठी गोलंदाजी व क्षेत्ररक्षण आखलं जात होतं. शिवाय, द.आफ्रिकेचं जोरदार "स्लेजींग" चालू होतंच. हे सर्व जणू सचिनला नुसतं खच्ची नव्हे, जमलंच तर जायबंदी करण्याच्या सुप्त हेतूनेच चाललं असावं, इतकं संशयास्पद होतं. आणि हे सर्व झाकण्यासाठी सचिनकडेच बोट दाखवून मोकळं होणं हा सोपा उपाय होता, कारण आपलेच कांही लोक हे असलं कांहीही उचलून धरतात, हें सर्वश्रुतच आहे !
ड्रेसींग रूममध्ये, कुणीही जायबंदी न होणं व कसंही करून डावाचा पराभव टाळणं या दोनच पर्यांयावर विचार झाला असावा; कालच्या खेळावरून कोणता पर्याय निवडला गेला याची कल्पना येते.

कारण आपलेच कांही लोक हे असलं कांहीही उचलून धरतात, हें सर्वश्रुतच आहे !>> अगदी अगदी. सायबांचे ५० शतक झाले म्हणून सुरु झालेली पोटदुखी आहे ही सगळी.
आपण ही सेरिज १-१ ड्रॉ करणार, तसा मला गावसकरचा दृष्टांत झाला आहे - http://www.maayboli.com/node/17479?page=2 Proud

भारत व बांग्लादेशकडून सपाटून मार खाल्यानंतर न्यूझीलंडने आत्ता जानराव राइट यांना प्रशिक्षक नेमले आहे.

http://www.espncricinfo.com/newzealand/content/current/story/493512.html

>>> सचिनने काही केले असते तरी लोक बोललेच असते.

सचिनने काहिही केले असते तरी हा सामना भारत जिंकणे किंवा वाचविणे अशक्य होते. डावाने पराभव कदाचित टाळता असता. पण सामना हरणार हे जेव्हा नक्की होते तेव्हा डावाने हरणे किंवा १० विकेट्सनी हरणे यात फारसा फरक नाही. ५ किंवा ६ व्या चेंडूवर एक धाव घेऊन तळाच्या फलंदाजांना गोलंदाजांपासून लांब ठेवणे असे दिवसभर करणे अशक्य असते. असे फार तर २-३ षटके करता येईल. तळाचे फलंदाज कधी ना कधी तरी गोलंदाजांसमोर येणारच. मुळात ४४९ ला धोनी बाद झाल्यावर केवळ ५-६ षटकात व १० धावात (त्यातल्या ८ धावा सचिनच्या) उरलेले तिघे बाद झाले यावरून हे लक्षात येते की सचिनने प्रयत्न करून सुध्दा डावाचा पराभव टाळता आला नसता.

द्.आफ्रिकेतील एकदिवसीय सामन्यांसाठी १६ जणांची यादी जाहीर झाली. मुनाफ पटेल, युसुफ खान. पियुश चावला यांचा समावेश तर रोहित शर्मा, जडेजाला डच्चू. मागे मी म्हटल्याप्रमाणे आपल्या उपखंडात होणार्‍या विश्वचषकासाठी संघात एकतरी लेग-स्पिनर उपलब्ध असणं आवश्यक आहे; त्यादृष्टीनेच तयारी म्हणून बहुधा चावलाची निवड झाली असावी. [ तो दोन वर्षांनंतर संघात पुन्हा आला आहे ]

<<< लक्ष्मण आणि इशांत खेळताना जास्त चेंडू इशांत ने खेळले लक्ष्मणने नाही हे इतक्यात विसरेल गेले!! तेंव्हा मात्र लक्ष्मण कसा स्ट्राईक रोटेट करुन तळातल्या लोकांना देखील खेळायला भाग पाडत होता असे मिडियाने लिहले. सचिन आहे म्हणून हे उलटे ..>>>>
केदार अगदी माझ्या मनातलं. लक्ष्मण तो बाब्या अणि सचिन ते कार्ट?

Pages