Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
मला हरभजन तिसरे कसोटी शतक
मला हरभजन तिसरे कसोटी शतक करतो का याचेच औत्सुक्य आहे!
मला ईंशांत पन्नास करेल का
मला ईंशांत पन्नास करेल का याचे जास्त औत्सुक्य होते
चला लवकरच संपेल सामना.
पुढील सामन्यात कुणा कुणाला बसवायचं, यादी मोठी आहे: श्री, उनाडकट, रैना, लक्षमण?
भारताच्या दुसर्या डावात सचिन
भारताच्या दुसर्या डावात सचिन बाद झाला तरच लक्ष्मणने मॅच विनिंग्/सेव्हिंग खेळी करायची असे त्याच्या काँट्रॅक्ट मध्ये आहे का? की तळाच्या फलंदाजांबरोबरच त्याची स्पेशल खेळी होते?
दोन्ही गोष्टी काँट्रॅक्ट
दोन्ही गोष्टी काँट्रॅक्ट मध्ये असाव्यात..
बाकी साहेबांचे नेहेमीप्रमाणे मस्त चालू आहे. २०० हवेत नुसते १०० नकोत.. साहेबांचे २०० व्हायला अर्थातच समोर धोणीचेही २०० व्हावे लागतील असो.
आजोबा, माझे चार मार्क
आजोबा, माझे चार मार्क तुमच्यामुळे गेले ! सचिन तुमचा लाडका असला ,तरी "सेंच्यूरीअन" हे नाव सचिनमुळे त्या शहराला दिलं, असं मला कां सांगितलंत ?
आजोबा, त्यादिवशीं मार्क कापले आणि त्याच उत्तराबद्दल आज शाळेत मोठा सत्कार केला माझा !
साहेबांचे पन्नासाव्वे शतक..
साहेबांचे पन्नासाव्वे शतक.. आता मॅच वाचवली तर दुधार साखर..
अभिनंदन!! ते पण महत्वाच्या
अभिनंदन!! ते पण महत्वाच्या वेळी.
अज़ून १ मेन बॅट्समन राहिला असता तर मॅच वाचली असतीच.
अज़ून १ मेन बॅट्समन राहिला
अज़ून १ मेन बॅट्समन राहिला असता तर मॅच वाचली असतीच. >> पाऊस
लोल. चिन्हे नाहीत. सामवेद
लोल. चिन्हे नाहीत. सामवेद उघडून मंत्र बघावे लागतील.
साहेबांचं त्रिवार नाही ५० वेळ
साहेबांचं त्रिवार नाही ५० वेळ अभिनंदन ! धोनीचं पण !!
चला.. टीव्ही/क्रिकइन्फो बंद
चला.. टीव्ही/क्रिकइन्फो बंद करा.. धोनी आउट..
मंत्राचे सामर्थ्य. एकदम
मंत्राचे सामर्थ्य. एकदम जोरात वारे वाहू लागले आहेत. खेळ थांबला.
उत्तम फाईटबॅकसाठी तरी भारतीय
उत्तम फाईटबॅकसाठी तरी भारतीय टीमचे अभिनंदन करायला हवे. काही वर्षांपूर्वी हा सामना तिसर्याच दिवशी संपला असता आणि आपण ३०० रन्स आणि इनिंग्ज असे काहीतरी हरलेलो असतो, त्यापेक्षा हे फारच चांगले आहे.
साहेबांचा नाद खुळा!!!
<<अज़ून १ मेन बॅट्समन राहिला
<<अज़ून १ मेन बॅट्समन राहिला असता तर मॅच वाचली असतीच. >> पाऊस >> असामी बडी आसामी असावी ! नुसता पाऊस नाही, वादळी पाऊस आलाय, त्यांचा शब्द पाळायला !!
मी म्हणालो होतो ३०० किंवा ची
मी म्हणालो होतो ३०० किंवा ची लिड राहिली असती तर मॅच वाचली असतीच. आपले ४५० झालेत ते पण ५०० रन्सचे टेन्शन घेऊन!! (३०० असले असते नक्कीच मनोबलावर आणखी + परिणाम राहिला असता.)
दुर्दैवाने रैना अन लक्ष्मण नाही खेळले अन्यथा आपण त्यांना लिड दिली असतीच पण मॅच हारलो नसतो. मात्र आपल्याला एक चांगला बॉलर पाहिजेच पाहिजे.
चला २ देव भारताच्या मदतीला
चला २ देव भारताच्या मदतीला आलेत - सचिन आणि पाऊस.
रैनाला आता काही काळ विश्रांती द्यावी. गांगुली आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या ३-४ वर्षात जसा ऑफच्या बाहेरच्या चेंडूला हमखास बॅट लावून स्लीपमध्ये किंवा यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद व्हायचा, अगदी तसाच रैना बाद होतोय. त्याच्याऐवजी युवराज, पुजारा किंवा कोहलीला घ्यावे. पुढच्या सामन्यात उनाडकट आणि श्रीसंथच्या ऐवजी झहीर आणि मुनाफ किंवा उमेश यादवला घ्यावे.
पुजाराला चान्स द्यायलाच हवा
पुजाराला चान्स द्यायलाच हवा आता. उनाडकट आणि श्रिसंथला आणखी एक संधी मिळायला हरकत नाही, मुनाफ पटेल पाचही दिवस फीट तरी राहिल का अशी शंका वाटते.
रच्याकने, केदारचा मंत्र लई भारी हां!!
चला आजचा खेळ संपला. आजचे मरण
चला आजचा खेळ संपला. आजचे मरण उद्यावर गेले. उद्या पावसाची ३५ टक्के शक्यता आहे. उद्या कमीतकमी चहापानापर्यंत जोरदार पाऊस पडून मैदान पाण्याने भरून जावे.
साहेबांच्या ५० व्या शतकाला सलाम! त्याचे २०१० मधल्या १३ व्या कसोटीतले हे ७ वे शतक! सचिन दुसर्या डावात किंवा संघ अडचणीत असताना खेळत नाही अशी श्रद्धा असणार्या सचिनद्वेष्ट्यांना त्याने आपल्या बॅटने अजून एक जोरदार चपराक दिलेली आहे.
पुजाराला संधी द्यायला हवी..
पुजाराला संधी द्यायला हवी.. आता द्रविड-लक्ष्मण ह्यांना पर्यायी खेळाडूचा शोध युद्धपातळीवर करावा लागणार आहे निवडसमितीला.. ह्या दोघांची जागा भरुन काढायला लै जिगरबाज फलंदाज हवेत..
केदार मंत्रपठण उद्या
केदार मंत्रपठण उद्या दुपारपासून पुढे चालू ठेवा!
"सचिन दुसर्या डावात किंवा
"सचिन दुसर्या डावात किंवा संघ अडचणीत असताना खेळत नाही अशी श्रद्धा असणार्या सचिनद्वेष्ट्यांना त्याने आपल्या बॅटने अजून एक जोरदार चपराक दिलेली आहे."
हे म्हणायला खूप घाई केली आहे. उद्या भारत सामना हरला की, सचिन स्वतःच्या विक्रमांसाठीच खेळतो, भारताच्या विजयाला त्याचा उपयोग होत नाहीत, असे शब्द प्रसवणार्या लेखण्या निब स्वच्छ करून शाई भरून घेताहेत.
हे म्हणायला खूप घाई केली आहे.
हे म्हणायला खूप घाई केली आहे. उद्या भारत सामना हरला की, सचिन स्वतःच्या विक्रमांसाठीच खेळतो, भारताच्या विजयाला त्याचा उपयोग होत नाहीत, असे शब्द प्रसवणार्या लेखण्या निब स्वच्छ करून शाई भरून घेताहेत.
>>>>
मला नाही वाटत आजच्या खेळीबद्दल कुणी 'किमान' उद्या तरी असे लिहायचे धाडस करेल.
एका वर्षात सर्वात जास्त धावा महंमद युसुफने २००६मध्ये काढल्या होत्या - १७८८. तेंडुलकरच्या आज अखेरीस १५३९ धावा झाल्या आहेत २०१० ह्या वर्षात. उद्याच्या दिवसात व बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये जर त्याने अजून २५० धावा काढल्या तर तो हा विक्रमदेखील मोडू शकेल.
"सचिन दुसर्या डावात किंवा
"सचिन दुसर्या डावात किंवा संघ अडचणीत असताना खेळत नाही अशी श्रद्धा असणार्या सचिनद्वेष्ट्यांना त्याने आपल्या बॅटने अजून एक जोरदार चपराक दिलेली आहे."
हे म्हणायला खूप घाई केली आहे. उद्या भारत सामना हरला की, सचिन स्वतःच्या विक्रमांसाठीच खेळतो, भारताच्या विजयाला त्याचा उपयोग होत नाहीत, असे शब्द प्रसवणार्या लेखण्या निब स्वच्छ करून शाई भरून घेताहेत.
--- २४ तास थांबा... सचिन द्विशतक करणार आहे.
सचिनचे ५० व्या शतका बद्दल अभिनंदन.
शतकांचं अर्धशतक.. साहेबांना
शतकांचं अर्धशतक..
साहेबांना मुजरा!!
सकाळी ५:३० ला उठल्याने शतक
सकाळी ५:३० ला उठल्याने शतक होतांना पहायला मिळाले
१ ऑक्टोबर पासुन आतापर्यंत त्याने ६०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत.
98 lbw 2 v Australia Mohali 1 Oct 2010 Test # 1972
38 caught 4 v Australia Mohali 1 Oct 2010 Test # 1972
214 bowled 2 v Australia Bangalore 9 Oct 2010 Test # 1973
53* not out 4 v Australia Bangalore 9 Oct 2010 Test # 1973
40 caught 1 v New Zealand Ahmedabad 4 Nov 2010 Test # 1974
12 bowled 3 v New Zealand Ahmedabad 4 Nov 2010 Test # 1974
13 caught 2 v New Z Hyderabad (Deccan) 12 Nov 2010 Test # 1975
DNB - 4 v New Z Hyderabad (Deccan) 12 Nov 2010 Test # 1975
61 caught 2 v New Zealand Nagpur 20 Nov 2010 Test # 1978
36 lbw 1 v South Africa Centurion 16 Dec 2010 Test # 1985
107* not out 3 v South Africa Centurion 16 Dec 2010 Test # 1985
आप्ले बॉलर पण कैपण एकाचे नाव
आप्ले बॉलर पण कैपण
एकाचे नाव श्रीसन्थ आणि करणार फास्ट बोलिन्ग
दुसरा उनाडकट
आता तिसरा अडाण नावाचा बोलर आणा म्हणजे झाले.
एकुण बोलिन्ग दबावाखाली होती पण पहिल्या दिवससर्खे पिच एक्दा मिळाले तर बहार होइल.
पाहु काय होते.
साहेबांचं त्रिवार नाही ५०
साहेबांचं त्रिवार नाही ५० वेळा अभिनंदन
सचिनचे अभिनंदन! आणखी एक
सचिनचे अभिनंदन!
आणखी एक गंमतशीर स्टॅटः भारताचा कोच गॅरी कर्स्टन चे टेस्ट मधले एकूण रन ७२८९. सचिन ने फक्त शतके केलेल्या डावांतील एकूण रन ७२८५
अरे व्वा मस्तच सचिनचे
अरे व्वा मस्तच सचिनचे अभिनंदन, पण फारेंडा तु पन्नासव्या शतका आधीच आयडी का बदललास
फारेन्डाला भिती वाटत होती
फारेन्डाला भिती वाटत होती साहेब ५० वे शतक कधी करतील ह्याची.... पण मी आधीच सांगितलं होतं त्याला डिसेंबर मध्ये नक्की होईल शतक म्हणून आणि तसेच घडतय... तर साहेबांचे लय लय लय अभिनंदन...
मॅच पावसानी वाचवली तरच.. फारफारतत डावाचा पराभव टळू शकेल पण पराभव टळणे फक्त पावसाच्या हातात.... आणि तसेच घडू दे रे देवा...
Pages