Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु
परवाच्या सोमवारी पॅट्रियट्स
परवाच्या सोमवारी पॅट्रियट्स नी जेट्स ना ४५-३ अश्या अत्यंत लांछनास्पद रीतीने हरवले. त्यावर रेक्स रायन, जेट्स चा कोच याने फूटबॉल घेतला नि एक खड्डा खणून त्यात पुरला. नि म्हणाला - दॅट्स इट. तो गेम आता संपूर्णपणे विसरा. झालाच नाही असे समजा. त्याबद्दल बोलू नका, त्याचा विचार करू नका. उरलेले सामने नेहेमीसारखे, आपण जिंकायचेच, अश्या समजुतीने खेळा.
तत्पूर्वी बिल बेलिचिकने २००१ साली, पॅट्रियट्स चा कोच असताना, एका सामन्यानंतर असेच केले होते. त्या वर्षी पुढे खेळून पॅट्रियट्स सुपर बॉल चँपियन झाले.
मला वाटते न्यू झीलंडने पण परत गेल्यावर या बांगलादेश्-भारत दौर्यावरच्या बॅटी, बॉल, पॅड्स इ. सगळे समुद्रात फेकून द्यावे, नवीन सामान आणावे नि जणू हा दौरा झालाच नाही असे समजून नवीन सुरुवात करावी.
<<मला वाटते न्यू झीलंडने पण
<<मला वाटते न्यू झीलंडने पण परत गेल्यावर या बांगलादेश्-भारत दौर्यावरच्या बॅटी, बॉल, पॅड्स इ. सगळे समुद्रात फेकून द्यावे, नवीन सामान आणावे नि जणू हा दौरा झालाच नाही असे समजून नवीन सुरुवात करावी.>> बापरे, समुद्रात न्यूझीलंडचे क्रिकेटचे सामान व मागोमाग ऑस्ट्रेलियाचे.. .. .. म्हणजे दक्षिण ध्रुवावर थप्पीच लागतील तरंगत आलेल्या सामानाची !!
ईतकी महागडी किटस समुद्रात
ईतकी महागडी किटस समुद्रात फेकण्यापेक्षा उदारमनाने दान केली तरी चालतील, बरेच गरजु आहेत.
नको.. गरजूंना असली अनलकी
नको.. गरजूंना असली अनलकी किट्स नकोत. आयुष्यभर हरतील बिचारे..
ऑस्ट्रेलियात शेन वॉर्नला
ऑस्ट्रेलियात शेन वॉर्नला निवृत्तितून परत बोलवायचे जोरदार वारे वहाताहेत ! पण वॉर्न कप्तानपदासाठी अडून बसेल, अशीही वदंता आहे !!
अग, आम्ही न्यूझीलंडचा केला
अग, आम्ही न्यूझीलंडचा केला तसा द. आफ्रिका आमचा व्हाईट वॉश नाही करूं शकत ! आम्ही वर्णभेदाचा आरोप करूं म्हणून जाम घाबरतात ते !!
भाउ तुमची मैत्रीण फारीन
भाउ तुमची मैत्रीण फारीन दिसतीय.
द आ. मधे आपल्यालाच वॉश मिळतो. या वेळेस बघू.
<<भाउ तुमची मैत्रीण फारीन
<<भाउ तुमची मैत्रीण फारीन दिसतीय>> विक्रमजी, माझ्या मुलाची किंवा नातवाची मैत्रीण दिसतेय म्हटलं असतंत तर छान वाटलं असतं
आणि "फारीन" दिसत्येय यावरून आत्ताच कुणीतरी पाठवलेला हा विनोद - एका भारतिय नटीची अमेरिकन विमानतळावर सुरक्षा तपासणी सुरू होती. तिच्या हातातला छोटा टीफिन बॉक्स तिला उघडून दाखवायला सांगण्यात आलं. ती संतापानं त्या ऑफिसरला म्हणाली " यू इडियट, ती माझी कपड्यांची सूटकेस आहे !"
कपड्यांवरून विदेशीपण ओळखायचे दिवस मला वाटतं खूपच मागे पडल्येत !!
(No subject)
भाऊ, व्यंगचित्र व विनोद
भाऊ, व्यंगचित्र व विनोद दोन्ही भारी
ती नटी, मल्लिका शेरावत नाही ना?
<<ती नटी, मल्लिका शेरावत नाही
<<ती नटी, मल्लिका शेरावत नाही ना?>>
गौतमस्टारजी, हे तुम्ही म्हणालात , मी नाही !:हहगलो:
भाऊ परत एकदा मस्त
भाऊ परत एकदा मस्त व्यंगचित्र...
<<ऑस्ट्रेलियात शेन वॉर्नला
<<ऑस्ट्रेलियात शेन वॉर्नला निवृत्तितून परत बोलवायचे जोरदार वारे वहाताहेत >> तर हा पठ्ठ्या इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या नटीचीच विकेट घेवून आला - फॉर्मबद्दल निवडसमितीची खात्री पटवायला !
ओळखूं ,काय चाललंय मनात ? " मानला या वॉर्नला ! कसं बरं जमवत असेल हा पठ्ठ्या हे सारं ?". बरोबर?
चला लोकहो आजपासून द आफ्रिका
चला लोकहो आजपासून द आफ्रिका पहिली टेस्ट चालू! बघू काय करतात आपले लोक. पाउसही दिसतो आहे.
नीओ क्रिकेट वर ही सिरीज दिसत नाही. विलो वर आहे. विलो सुद्धा महिन्याप्रमाणे मेम्बरशिप देत आहे. पूर्वी सिरीज प्रमाणे होती.
तेंडुलकर वर हे धमाल लिहीलेले सापडले. स्टॅट्स बद्दल एवढे मस्त लिखाण क्वचितच मिळते.
http://blogs.espncricinfo.com/andyzaltzman/archives/2010/12/tendulkars_c...
तिकडे पर्थला तिसरी अॅशेस मॅच ही आज आहे. तीही विलो वर आहे.
अजून पिचेस चे स्टँडर्ड बनवता
अजून पिचेस चे स्टँडर्ड बनवता येत नाही >>म्हणजे नेमके काय करायचे ?
<<स्टॅट्स बद्दल एवढे मस्त
<<स्टॅट्स बद्दल एवढे मस्त लिखाण क्वचितच मिळते>> फारएण्ड, खरंय. लिंक बद्दल धन्यवाद. [कांही वर्षांपूर्वी, सचिनचा भारतीय संघाच्या विजयात कसा महत्वाचा हातभार आहे व सचिनच्या खेळीमुळे भारतीय संघ कसा क्वचितच जिंकला आहे, हे दोन्ही परस्परविरोधी दृष्टीकोन दोघा भारतीय क्रिडासमीक्षकानी स्टॅटसच्याच आधाराने रंगवले होते !]
चला, आंकडेवारीपेक्षाही आजच्या खेळाचा आनंद आज लुटणं हे उत्तम !!
ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात
ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात वाट लागलेली आहे.
शिवाय आज आपण सा आ ची लावली की शनिवार रविवार किती सुखात जाणार याची स्वप्न मला आताच पडू लागली आहेत.
आज पाउस नको यायला.
अजून पिचेस चे स्टँडर्ड बनवता येत नाही >>म्हणजे नेमके काय करायचे >> कालच ऑस्ट्रेलियाचा कुणीतरी माजी खेळाडू म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या र्हासाला सगळी पिच एक सारखी असण हे एक कारण आहे.
<<ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात
<<ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात वाट लागलेली आहे.>> वाट लागण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल तुम्हाला, असं दिसतंय . हसी, हॅडीन व जॉनसन यानी डाव सांवरला आहे . ६९-५ वरून आता १६९-६ असा स्कोअर आहे.
<<आज पाउस नको यायला.>> आलाच तर तो आमच्या धावांचा असूं दे रे, म्हाराजा !):डोमा:
ऑस्ट्रेलियाच्या डावात नेहमी
ऑस्ट्रेलियाच्या डावात नेहमी प्रमाणे कोणी तरी एक खेळतोच आहे... पण फार काही धावा होतील असे दिसत नाहीये...
कॉलिंगवूड जवळचे कॅचेस मस्त
कॉलिंगवूड जवळचे कॅचेस मस्त घेतो. आज पाँटिंगचा काय जबरी घेतलाय!
<<ऑस्ट्रेलियाच्या डावात नेहमी
<<ऑस्ट्रेलियाच्या डावात नेहमी प्रमाणे कोणी तरी एक खेळतोच आहे... >> मग्रूरीमुळे त्यांचा राग येत असला तरी ऑसीज झुंजार आहेत, हे नाही नाकारता येणार !
ज्या त्या देशाचे व्यक्तिमत्व
ज्या त्या देशाचे व्यक्तिमत्व खेळातही उतरते असे म्हणता येईल का? ऑस्ट्रेलिया हा मवाल्यांचा देश. ब्रिटनमधले हद्दपार मवाली तिथे सोडत. ती मवालीगिरी, असभ्यता त्यांच्या खेळातही दिसते. अगदी अन्डरार्म क्रिकेटसह. ब्रिटिश सभ्य, नियमानुसार वागणारे पण स्वतःपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हा गन्ड बाळगणारे. जगात ब्रिटनचे महत्व कमी झाले तसे जन्मदाते असून क्रिकेटमध्येही कमी झाले. . विन्डीजवाले बेदरकार, ताकदवान. श्रीलंकेवाले बन्डखोर. पाकिस्तानी जन्मजात भिकारडे . न्यूझीलन्डला तर राजकीय व्यक्तिमत्व नाही तसे क्रिकेटमधे ही नाही. त्यांचा काही विशिष्ट स्वभावही दिसून येत नाही. भारताचा स्वभाव राजकीय दृष्ट्या अनाक्रमकच आहे. डॉ. कलामही म्हटले होते आम्ही १०००० वर्षे कोणावर आक्रमण केलेले नाही. तीच वृत्ती क्रिकेट (व इतर खेळातही ) दिसते. आपल्या खेळात डॅशिन्गपणा अभावानेच दिसतो. कुणी अंगावर आले तर शिंगावर घेण्याचा प्रयत्न आपण करतो पण त्यात आपली चांगलीच पळापळ , दमछाक होते. भारतावर झालेल्या शेजार्यांच्या आक्रमणाबाबतही आप्ला हाच स्वभाव दिसतो . ती आपण परतवली पण गडबडून गेलोच होतो. तसेच क्रिकेटमध्येही आपण जीव वाचवता वाचवता जिंकतो ...
या खेळपट्टीवर इंग्लंडला
या खेळपट्टीवर इंग्लंडला सुद्धा फलंदाजी करणे खूप अवघड जाणार आहे. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इंग्लंडच्या अंगाशी येईल (विशेषत: ४ थ्या डावात फलंदाजी करताना त्यांना पश्चाताप होईल).
मास्तुरे.. तसंच वाटतय.. पण
मास्तुरे.. तसंच वाटतय.. पण सध्याचा इंग्लिश फलंदाजांच फॉर्म बघता त्यांना कदाचित दुसरा डाव खेळावा लागणारही नाही....
फारेण्ड ती लिंक महान आहे... फार जबरी लिहिलय त्या लेखात...
मास्तुरे - मी मॅच बघत नाहीये
मास्तुरे - मी मॅच बघत नाहीये पण ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्या जनरली ट्रू असतात. दुसर्या व तिसर्या दिवशी निवळतात. हिम्स्कूल म्हणतात तस दुसर्या डावात खेळायची वेळ इंग्लंड वर येईल अस वाटत नाही.
पहिल्या दिवसापासून आखाड्यात कुणालाच खेळता येत नाही किंवा पाचही दिवस पाट्यावर सगळेच हात धुवून घेतायत असल्या खेळपट्ट्या आपणच बनवू शकतो;
>>> पण सध्याचा इंग्लिश
>>> पण सध्याचा इंग्लिश फलंदाजांच फॉर्म बघता त्यांना कदाचित दुसरा डाव खेळावा लागणारही नाही....
आस्ट्रेलियाला इतकं कमी लेखू नका हो. ते शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाहीत. आतासुध्दा आस्ट्रेलियाने ५ बाद ६९ वरून ९ बाद २३३ अशी बर्यापैकी मजल मारलेली आहे.
पर्थला ४ थ्या डावात फलंदाजी करणार्या किती संघांनी आजवर विजय मिळविलेला आहे? कोणाकडे आकडेवारी आहे का?
<<ज्या त्या देशाचे
<<ज्या त्या देशाचे व्यक्तिमत्व खेळातही उतरते असे म्हणता येईल का? >> असेलही, पण मला असंही जाणवतं कीं निदान खेळात तरी शारिरीक वैशिष्ठ्यं अधिक प्रभावी ठरत असावीत. लवचिकता हा आपल्या उपखंडातील खेळाडूंचा स्थायीभाव म्हणता येईल; म्हणूनच जी नजाकत, मनगटी खेळाची करामत सर्वसाधारणपणे इथल्या खेळाडूत उपजत दिसते तशी इतर देशातील खेळाडूत अपवादात्मक [ लारा, रॉबिन स्मिथ, गॉवर इ.] दिसते. हे आपलं माझं सहजचं निरीक्षण, सिद्धांत नव्हे.
ऑसीज २३३-९. जॉनसन ६२ वर धावा वाढवण्याच्या नादात सुंदर खेळी करून बाद. पायचित बाद दिलेल्या खेळाडूला तिसर्या पंचाने तो [चुकीचा] निर्णय बदलून त्याला नाबाद ठरवायचा दुर्मिळ थरार आज ऑसीजच्या डावात अनुभवायला मिळाला !
पर्थला ४ थ्या डावात फलंदाजी
पर्थला ४ थ्या डावात फलंदाजी करणार्या किती संघांनी आजवर विजय मिळविलेला आहे? कोणाकडे आकडेवारी आहे का>> १९७० नंतर ९ वेळा. त्याच बरोबर १० वेळा ४ थ्या डावात फलंदाजी करणारा संघ धावांनी हरलाय सुद्धा. यात डावाने पराभव झालेले सामने धरले नाहीत.
ऑसीज सर्वबाद २६८. मस्त मॅच
ऑसीज सर्वबाद २६८. मस्त मॅच चाललेली आहे. इंग्लंडची फलंदाजी सुध्दा ढेपाळेल असं वाटतंय.
विक्रमा... डावाचा पराभव असेल
विक्रमा... डावाचा पराभव असेल तर चौथा डाव खेळावाच लागत नाही... त्यामुळे तसे सामने आपोआपच बाद होतात...
सलग पाचव्या डावात ऑसीजला धाप लागलीये ३०० धावा करता करता...
Pages