संघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान

मनकोलाज - १

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

सकाळच्या पारी जीमचा रस्ता पकडते तेंव्हा बर्‍यापैकी काळोख असतो. त्या धूसर अंधारात दवात न्हाल्या रस्त्याचा, झाडापानांचा मिळून येणारा ओला वास माझी पहाटे उठण्याची नाराजी घालवतो.
नेहमीच्या झाडाखाली मी गाडी पार्क करते. एक मोठ्ठा श्वास घेऊन आत शिरते. शूज चढवून अवयवांना चालू करते.
स्वत:ची अशी निरुपद्रवी पाच मिनिटं मला सध्या मिळत नाहीत. वर्क आऊट चालू असतानाही पुढं दिवसात घडतील अशा आणि मला घडवायलाच हव्यात अशा गोष्टींची यादी फ़िरत असते.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

शिशिरातल्या दुपारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

खूप दिवस झाले लिहून. कधी सुचायचं तेंव्हा वेळ नसायचा. आणि आता लिहायचंच म्हणून बसलं की मग सगळी पाटी कोरी. ते काल घडलेलं, आज सकाळीच अनुभवलेलं सगळं धुक्यागत विरळ होत जायचं. लख्ख उन्हात आज आणि आत्ता घडणारं वास्तव दिसायला लागायचं ज्यात काहीच सापडायचं नाही सांगण्याजोगं. सगळं कोरडं, शिशिरातल्या दुपारीसारखं. इतकं की वाटायचं हेच सत्य. या पलिकडं कुठला ऋतू, कुठलं वर्तमान असूच नाही शकत. शिशिरातली झाडं पाहिली की कसं वाटतं, हॅं या झाडांना कधी बहर थोडाच येणार आहे. संपलीच आता ही. तसंच विचारांचं होतं कधी कधी. शिशीर उलटतो. झाडं आपल्या धर्माला अनुसरून पुन्हा बहरतात.

विषय: 
प्रकार: 

पुस्तक परिक्षणे : थाउजंड स्प्लेंडीड सन्स आणि अजून काही.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मी लिहीलंय याची जाहिरात करण्यासाठी नाही तर जास्तीत जास्त लोक सहज रंगीबेरंगीवर येतात त्यांच्यापर्यंत हेच नाही तर एकूणच वाचू आनंदे हे पान पोचावं म्हणून..

कादंबरी : थाऊजंड स्प्लेंडीड सन्स
लेखक : खालिद होसेनी
http://www.maayboli.com/node/15960

कादंबरी : मी मलाच माहित नाही.
लेखक : राजन खान
http://maayboli.com/node/16555

विषय: 
प्रकार: 

जगणे परंतु गमले नाही...

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

माझं मीपण हरवतंय का? मी स्वप्नात माझ्या मन:शांतीच्या मागे पळत राहते आणि दिवसा आयुष्याच्या. हल्लीची सकाळ फारशी ताजी, उत्साहवर्धक नसतेच. डोळे उघडायच्या आणि मेंदूचा पिसी पूर्ण बूट अप व्हायच्या आतच काय काय करायचं राहिलंय याची यादी मनात तयार व्हायला लागते. एकूणच आपण ठरवलं तसं काही घडत नाहीये किंवा त्यापेक्षा आपण त्यासाठी प्रयत्न करत नाहीये याचं टेन्शन येतं.

विषय: 
प्रकार: 

मनमोकळं-७

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बॉम्बिली बिलीबॉम. मागच्या सीटवर माझ्या मैत्रिणीचा मुलगा माझ्या कानात ओरडतोय. गाडीतला स्टिरियो फुल वॉल्युमवर ठणठण चालू आहेच. बाजूलाच माझी भाची काहीतरी यो टाईप्स्स हातवारे करतेय. आवाज एका विशिष्ट पट्टीच्या वर गेल्यावर मला कुठलंच गाणं सहन होत नाही खरंतर. पण आज तो लाव्हा कानात ओतत असताना मी तो एंजॉय करतेय की काय अशी शंका येईपर्यंत शांत आहे. पुढे मैत्रीण आणि तिचा नवरा शांत गाणी आणि ढिंच्च्याक गाणी यावर वाद घालतायत. शांत गाण्यांची बाजू घेणारी मैत्रीण तावातावाने आणि ढिंच्याकची बाजू घेणारा शांतपणे.

विषय: 
प्रकार: 

मज़ा कोहरेके पर्देमे है....

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सुखं दुखतात. संथ आपल्या लयीत कुणासाठी तरी जगायचं म्हणून चाललेलं आयुष्य़ एका वळणावर येऊन एक मोट्ठा श्वास घेतं. जणू त्या वळणावरच तू येणार हे माहीत असल्यासारखं झाडीतून नशीब बाहेर येतं आणि म्हणतं "आलीस? ये.. माहीतच होतं मला तू येणार हे. घे घे अजून थोडे मोट्ठे श्वास घे. पण नंतर पुन्हा लगेच चालायला नको लागूस. विचाराला बस."
विचाराला बसू? अभ्यासाला बसल्यासारखी? बरं.
" नको गं प्रत्येक गोष्टीला बरं म्हणू. तू ठरव की तुला काय करायचंय. किंवा काय करायचं होतं आणि ते झालं का?
आणि जे काही करायचं असं तुला वाटत होतं ते होऊनही तू सुखी झालीस का? "
एकदम फिल्मी होतंय हे कळतं पण तरी घडतंय तेही खरंच.

विषय: 
प्रकार: 

मनमोकळं-६

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नऊ वर्षं होऊन गेली या अफेयरला. एखाद्या अभ्यासू रोज तेल लावून घट्ट वेण्या घालणार्‍या, आईवडील बर्‍यापैकी
पॉकेटमनी देत असूनही मोजकेच खर्च करणार्‍या, पार्ट्या, फॅशन तत्व म्हणून टाळणार्‍या मुलीनं केसांची पोनीटेल

विषय: 
प्रकार: 

असंच आपलं काहीतरी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कधी तासन्तास डोळे दिपवणार्‍या ढगांच्या गाद्या, कधी चिमूटभर ढगांच्या पुंजक्यांच्याही नितळ समुद्रात नाचणार्‍या आणि इतक्या वरूनही दिसणार्‍या सावल्या, कधी वाळूचीच जमीन अन वाळूचेच डोंगर आणि एकच तपकिरी रंग.

विषय: 
प्रकार: 

मी आणि माझा "तो"

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मी देवभोळी नाही पण नास्तिकही नाही. विश्वाचा पसारा निर्माण करणारी शक्ती कुठल्यातरी फॉर्ममधे अस्तित्वात आहे

विषय: 
प्रकार: 

ओन्ली फॉर यू!

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

एखादं अनपेक्षित आंदण मिळताना होतो तितकाच आनंद असंच एखादं देताना पण होतो.
कुणाला तरी ते मिळाल्यावर होणार्‍या आनंदामुळं कदाचित त्यापेक्षा जास्तच खरंतर.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - संघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान