इतिहास

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

Submitted by पराग१२२६३ on 11 November, 2023 - 05:00

युद्ध नको बुद्ध हवा.

Submitted by शब्दब्रम्ह on 3 October, 2023 - 06:34

आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे, मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो,वा आपल्याच विचारांचं घोडं नाचवणारा तालिबान सारखा दहशतवादी गट.सत्तेची भूक प्रत्येकाच्याच उदरात उसळलेली आहे.पण क्षणभूंगुर असणारी ही सत्ता सहसा मिळत नाहीच मुळी.ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून ती हिसकावून घ्यावी लागते.तिच्यासाठी रक्तार्पणाचा महायज्ञ करावा लागतो. या सत्ता ग्रहाणासाठी मग एकच मार्ग उरतो... युद्ध...ज्यामध्ये लाखो निरपराधी लोक हकनाक मारले जातात.युद्ध... जिथे सारं काही माफ असतं, अगदी सामान्य जणांच्या मुंडक्यांचा थर रचण्यापासून ते एखाद्या सात वर्षाच्या कोवळ्या मुलीचं शरीर ओरबडण्यापर्यंत.

240 वर्षांचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

Submitted by पराग१२२६३ on 14 September, 2023 - 01:26

भारताचा बहुतांश प्रदेश ब्रिटिशांच्या अधिपत्त्याखाली आल्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात असलेल्या अन्य युरोपीय वसाहती आणि भारतीय संस्थानांबरोबरचा व्यवहार पाहण्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासू लागली. तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जच्या कार्यकाळात कंपनीच्या कोलकत्यातील Board of Directors ने परवानगी दिल्यावर 13 सप्टेंबर 1783 ला कंपनीचा भारतीय परराष्ट्र विभाग स्थापन झाला. भारताच्या सध्याच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं (Ministry of External Affairs) ते मूळ मानलं जातं.

सोन्याचा महाल ते भुकेकंगाल: मुघलांच्या पतनपर्वातील रोचक कहाण्या

Submitted by अतुल. on 10 September, 2023 - 01:14

बाबर पासून बहादुरशाह जफर पर्यंत विविध मुघल सम्राटानी या देशावर सत्ता गाजवली. विशेषतः बाबर (इ.स. १५२६) ते औरंगजेब (इ.स. १७०७) पर्यंत मुघलांची निरंकुश सत्ता होती म्हटल्यास वावगे ठरू नये. जे प्रादेशिक राजे वा प्रांतिक शासक शरण येत नाहीत त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या नृशंस हत्या करायच्या, त्यांच्या जमिनी बळकवायच्या, त्यांच्या स्त्रिया पळवून आणायच्या आणि त्यांची राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणून तेथील कर आपल्या तिजोरीत भरायचा, अशी सर्वसाधारणपणे मुघलांची राज्य करण्याची पद्धती होती. शेकडो ते हजारो स्त्रिया मुघल बादशाहांच्या जनानखान्यात असल्याचे सांगितले जाते.

शब्दखुणा: 

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

Submitted by पराग१२२६३ on 31 July, 2023 - 03:32

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत. उमेद भवन राजवाडा स्वातंत्र्यप्राप्तीच्या जेमतेम चार वर्षे आधी बांधून पूर्ण झाला होता. त्यामुळं हा उपखंडातला सर्वात तरूण राजवाडा मानला जातो. आम्ही हा राजवाडा पाहायला गेलो, त्या घटनेला आता 33 वर्ष होत आली आहेत, पण तरीही त्या आठवणी अजून ताज्या आहेत.

"ध" चा "मा"

Submitted by Revati1980 on 26 July, 2023 - 08:35

"हा बघ, हाच तो शनिवार वाडा."
"ओह, नारायण राव पेशवे युस्ड टू स्टे हिअर, ते?"
" हं .."
"अच्छा, सॅटर्डे अपार्टमेंट.. ओके..
अरे ते अपार्टमेंट नाही बेटा, इट इज या टाईप ऑफ कॅसल."
" ओह बेटा?.. मी डॅड चा बेटा व्हर्जन का..? ...."
" हाहाहा.."
"नाही.. पण तो शनिवार किल्ला नाही. वाडा असंच म्हणायचं. किल्ला जनरली डोंगरावर असतो .
"अरे वाड्याच्या भिंती तर बघ.. फोर्ट्रेस से कम नही.."
"यप... अँड नारायण वॉज ऑर्डर्ड टू किल्ल बाय हिज अंकल. हो ना डॅड?
"होय "
अँड हिज घोस्ट स्टील हॉन्ट्स धिस प्लेस. हो ना ?
" येस, असं म्हणतात."

।। 'हिंग' पुराण - अध्याय दुसरा ।।

Submitted by संजय भावे on 24 July, 2023 - 07:02

"अच्छा जल्दी बताओ हिंग को इंग्लिश में क्या बोलते हैं?"

शब्दखुणा: 

नोलान - ओपेनहायमर, गीता, मॅनहटन आणि एआय

Submitted by ढंपस टंपू on 23 July, 2023 - 03:14

असे म्हणतात कि जग बदलून ठेवणार्‍या व्यक्तींमधे ओपेनहायमरचा समावेश होतो. नोलान म्हणतो कि ओपेनहायमरने जग असं बदलून ठेवलं आहे कि ते आता मागे जाऊन जैसे थे करता येत नाही. आपण आता पोस्ट ओपेनहायमरच्या जगात राहतो.

त्याने बर्‍याचशा मुलाखतीत ओपेनहायमरच्या हातात एक क्षण असा होता कि ज्या क्षणी तो हे सगळं थांबवू शकत होता, पण तो स्वतःला आवर घालू शकला नाही असे म्हटले आहे. चेन रिअ‍ॅक्शनचा ट्रिगर दाबण्याआधी त्याने संयम पाळला असता तर आजचं जग हे सुंदर असतं. कुठे तरी त्यालाही हा ट्रिगर दाबून पहायची तीव्र उबळ होती असे म्हणतात.

विषय: 
शब्दखुणा: 

मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

विषय: 
शब्दखुणा: 

।। 'हिंग' पुराण - अध्याय पहिला ।।

Submitted by संजय भावे on 11 July, 2023 - 04:02


मिसेस पोद्दार ने पेश कि बेसनगट्टे कि सब्जी
मिसेस मोंगा ने बनाई दाल मखनी
मिसेस चॅटर्जी कि बैंगन भाजी
मिसेस नायर का सांबार
मिसेस गुप्ता का राजमा
और मिसेस विरानी का उंधियू
वाह! सबको मिलते है दस में से दस...
अब चिट निकालके हि होगा मिसेस शेफ का फैसला...
इन दस नंबरीयोंने ऐसा क्या डाला कि स्वाद हुवा निराला?

Pages

Subscribe to RSS - इतिहास