लेखन

संवाद : BMM २०२६: उत्तररंग सह-अध्यक्षा (co-chair) - श्रीमती उषा आडगावकर

Submitted by सुखदा देवधर on 17 July, 2026 - 13:30

नमस्कार मंडळी!

बीएमएम २०२६ (BMM 2026 - बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२६) मधे ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण 'उत्तररंग' आयोजित केला आहे. त्यामध्ये उत्तम चर्चासत्र, व्याख्याने आहेतच. पण मला उत्सुकता आहे ती त्यातल्या अंताक्षरीची. या अंताक्षरीचा सगळा बेत आखलाय आपल्या उषा काकूंनी.

विषय: 

मानवाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड (Turning point)

Submitted by चामुंडराय on 12 September, 2026 - 12:15

नुकताच मानवजातीने एक महत्वाचा लोकसंख्याशास्त्रीय टप्पा ओलांडला आहे. मानवाच्या संपूर्ण इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे किंबहुना असे काही घडेल अशी कल्पना कधीही केली गेली नसेल.

विषय: 

"साकार "

Submitted by @अज्ञात म्हणे on 10 September, 2026 - 10:41

नको वाटती भरजरी वस्त्र-शेले,
तुझ्याच पदराने डोळ्यांस जग सोपे केले!

​अचंबा करतेस कसला माझ्या श्रीमंतीचा,
आंसवांचे तुझ्याचसाठी मी हार केले!

​दिसलीस तू जेव्हा वर्तमान तारण राहिले,
नकळता झालीच बाधा, षड्रिपूंना ठार केले!

​मोजत बसलोच नाही जखमा मी कधी,
शेवट म्हणता तू जीवना, तरी किती हे वार केले!

​"मोहापासून ज्यास उसंत तोच अताशा खरा संत",
असे बोलता, पैसे बघता, पुन्हा डोळे हे चार केले!

किती ते निरागस हास्य, वल्गना खळ्यांची,
साकाराया तुझी सावली, सूर्यासहि बेजार केले!

विषय: 

सादर करीत आहोत...

Submitted by अपूर्व जांभेकर on 7 September, 2026 - 03:19

"तुम्ही...आ...आत्ता?"....दुपारी साडेबारा-पाऊण च्या सुमारास, नचिकेतच्या बाबांना दारात अनपेक्षितपणे पाहून नचिकेतची आई चपापलीच. ती नुकतीच न्हाऊन बाथरूम मधून बाहेर आली होती. ओल्या गच्च केसांवर पंचा बांधला होता...सावळा गोलाकार चेहरा....मध्यम बांधा...बुटकीशी आकृती आणि चाळीशी ओलांडून स्थिरावलेलं एकंदरीतच सर्वसाधारण वय व व्यक्तिमत्व. "का? माझ्याच घरी, दुपारी यायला बंदी आहे कि काय मला?" दारात उभे असलेले नचिकेतचे बाबा घराच्या आत निरखून डोकावत खरखरीत सुरात म्हटले .

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

एक तासाचा शिक्षक

Submitted by अर्जुन ..✍️ on 5 September, 2026 - 08:12

ऑफिसची मीटिंग कधी संपेल याची वाट पाहत होतो. "राहिलेले मुद्दे आपण ऑनलाइन मीटिंगमध्ये डिस्कस करू," असं सांगून मुंबईच्या ऑफिसमधील माझी पहिलीच मीटिंग शेवटी संपवली.
दुपारचे दोन वाजले होते. ऑफिसमधून बाहेर पडलो आणि पुण्याला जाणारी बस पकडण्यासाठी रिक्षा स्टँडकडे निघालो. तेवढ्यात कानावर 'वाशी जंक्शन' असे शब्द पडले आणि अचानक एक गोष्ट आठवली.
आपली कॉलेजमधली मैत्रीणही इथेच कुठेतरी एका कॉलेजमध्ये लेक्चरर आहे.
सोळा वर्षांपूर्वी आमची शेवटची भेट झाली होती. त्यानंतर फक्त अधूनमधून सोशल मीडियावर एखादा-दुसरा मेसेज, एवढंच काय ते बोलणं.

विषय: 

'हे' आणि 'ते'

Submitted by मुग्धमानसी on 4 September, 2026 - 07:38

”या" बर्‍याच जणांना बरंच काही बोलायचं असतं. सांगायचं असतं.
त्यातलं बरंचसं ते एकमेकांत बोलत राहतात. आपापल्यात चर्चा करतात. वाद घालतात. दोघा-चौघा भरवश्याच्या लोकांत विरोध प्रकट करतात. भांडतात. निषेध करतात. घरी जातात. झोपतात.
झोपेत भांडणाची स्वप्नं पडतात. ती भांडणं क्रांतीची वाटतात. अजून हे बोलायला हवं होतं... हेही बोलायला हवं होतं... अस्सं ठणकावून सांगायला हवं होतं.... असं सारं गंभीर क्रांतीचं व्हायला हवं होतं.... या धुंदीत झोपतात. पराक्रम पांघरून झोपतात. पुढच्या क्रांतीचे संवाद मनात तयार करत झोपतात.

शब्दखुणा: 

लेखन उपक्रमः गेले करायचे राहून

Submitted by संयोजक on 3 September, 2026 - 12:56

नमस्कार मायबोलीकर मंडळी!

गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे -

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले

इथे अरमान निकलना म्हणजे इच्छा पूर्ण होणे. आपल्या असंख्य इच्छा , स्वप्ने असतात. त्यातल्या सगळ्याच पूर्ण होतात असे नाही. काही पूर्ण करायची संधी मिळत नाही, कधी अडचणी येतात किंवा "पुढे कधीतरी," म्हणत करायचे राहूनच जाते.
अशाच अपुर्‍या राहिलेल्या इच्छांबद्दल , प्रत्यक्षात न आलेल्या स्वप्नांबद्दल लिहिण्याचा हा उपक्रम.

विषय: 

लेखन स्पर्धा - पाककृती लेखन

Submitted by संयोजक on 3 September, 2026 - 12:44

नमस्कार मायबोलीकर मंडळी !

दरवर्षीच्या मायबोली गणेशोत्सवात पाककृती स्पर्धा असतातच. यंदाही आहेत. पण ही स्पर्धा जरा नव्हे, बरीच वेगळी आहे. ही लेखनाची , लेखनकौशल्याची स्पर्धा आहे. तुम्हांला हव्या त्या पदार्थाची कृती इथे तुम्ही सांगायची आहे. ते लेखन पेरलेल्या विनोदांमुळे खुसखुशीत ,चुरचुरीत, खमंग ; घेतलेल्या चिमट्यांमुळे तिखट, टोकदार, काटेरी ; भावनांना - आठवणींना हात घातल्याने स्निग्ध , रसाळ, हरवाळ किंवा अगदी संपता संपेना असे पसरट , पातळ, रटाळ कसेही असू शकते.

विषय: 

भूतभगिनी

Submitted by बिपिनसांगळे on 2 September, 2026 - 11:23

भूतभगिनी
--------------------------------------------------------------------------------------------------------
‘आपण भूत भूत खेळूया ! ‘ नेहा म्हणाली.
‘ चालेल ! मज्जा ! ‘ रिया म्हणाली.
खरं तर यात नवीन काहीच नव्हतं. हा त्यांचा नेहमीचा खेळ होता. नेहाच्या आईला तो अजिबात आवडत नसे. मुळीच आवडत नसे. ‘ हा कसला घाणेरडा खेळ ? शी बाई !’ असं ती वैतागाने नेहमीच म्हणायची. आणि या दोघी तरीही तो खेळ नेहमीच खेळायच्या. लहानांचे खेळ मोठ्या मंडळींना बऱ्याचदा आवडतच नाहीत.

विषय: 

शाबास पक्की.

Submitted by केशवकूल on 26 August, 2026 - 08:26

मे महिना येणार ह्या काल्पनेने पक्कीला एप्रिल महिन्यातच उत्साहाचे उधाण येत असे. पक्की मे महिन्याची चातका सारखी वाट पहात असतो. मे महिना व्हायच्या आधीच पक्कीच्या बाबाना नदी काठी होणाऱ्या व्याख्यान मालेचे वेध लागत. या वर्षी कोण कोण साहित्यिक, राजकीय कार्यकर्ते, अभिनेते, गायक हजेरी लावणार त्याची बित्तं बित्त बातमी मिळत असे.
"पक्की, ह्यावर्षी आमच्या व्याख्यान मालेत योगेश कुमार येणार आहेत. तुमच्या मालेत कोण येणार आहे सांग." पक्कीचे बाबा कधी कघी पक्कीची अशी मस्करी कारतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन