मायबोली आयओएस अॅप प्रकाशीत झाले.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
आजपासून मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
मायबोलीचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाल्या दिवसापासून , iOS अॅप कधी येणार अशी विचारणा सुरू होती.
आजपासून मायबोलीचे ios अॅप, अॅपल अॅपस्टोअरमधे सगळ्यांंसाठी उपलब्ध आहे.
काही गाणी अशी असतात की ती मनात निवांतपणे घर करून राहतात; पण त्यांचे खरे अर्थ मात्र काळाच्या ओघात, अनुभवांच्या साठ्याने आणि वयाच्या परिपक्वतेने हळूहळू उलगडत जातात. “बरसात की रात” मधली ही कव्वाली त्यातलीच एक.
लहानपणी बाबा जेव्हा हे गाणं लावायचे, तेव्हा मनात फक्त एकच विचार यायचा तो म्हणजे “कायच्या काय मोठ्ठं गाणं आहे!” ते ऐकण्याचाही कंटाळा यायचा. त्या वेळेस त्यातलं गूढ, त्याची खोली किंवा त्याचा आत्मा काहीच स्पर्शून जात नव्हता. मनात उमटणारा एकच शब्द “रटाळ!”
काही चित्रपट असे असतात की ते संपल्यानंतर खरा चित्रपट आपल्या मनात सुरू होतो. 'वन-विदिशा' हा माझ्यासाठी तसाच एक अनुभव.
सगळ्यांचे दुःख निवारण करण्याच्या निमित्ताने आपल्या समाजात सतत नवनवीन “बाबा” जन्माला येत असतात. लग्न होत नाही, मुलगा नीट वागत नाही, जमिनीचा वाद मिटत नाही… अशी अनेक कारणं असतात. लोक इतके हतबल होतात की, स्वतःला जन्मापासून ओळखत असूनही स्वतःची बुद्धी आणि आयुष्य एखाद्या व्यक्तीच्या हाती सोपवतात या आशेने की तो त्यांच्या दुःखाचं निवारण करेल.
चार ४ आणि गणिती operations वापरून अनेक संख्या सहजी बनतात.
जसे:
1 4 ÷ 4 + 4 − 4 = 1 + 0
8 4 + 4 + 4 − 4 = 8
28 4! + 4 − 4 + 4 Factorial!
2 4 ÷ 4 + 4 ÷ 4 = 1 + 1
52 4‖4 + 4 + 4 Concatenation
एक साधा खेळ बनवला आहे. खेळून पहा, कसा वाटतो ते सांगा, आवडल्यास इतरांनाही पाठवा.
Rahi Anil Barve यांनी AI tools वापरून (low budget experiment म्हणून) बनवलेला हा सिनेमा, एका पुरातत्त्व अधिकाऱ्याच्या म्हणजेच सदाशिवच्या अनुभवातून “अज्ञात”, “मन” आणि “भीती” यांचा शोध घेतो.
सदाशिव एका दुर्गम गावात हडमगाव येथे येतो. गावाबाहेर पावसाने उघड झालेला एक गूढ घुमट/मंदिर, आणि त्याभोवती फिरणारे विचित्र, अबोल गावकरी हे सगळं वातावरण स्वतःच एक पात्र बनून उभं राहतं.
मला तर पूर्वसंचित किंवा पुण्यसंचय ही गोष्ट भविष्यात आपण कधी काही करण्यास कमी पडलो तर माफी मिळावी किंवा सवलत मिळावी, या अपेक्षेने आधीच करून ठेवलेली चांगल्या कामांची तजवीज वाटते.
दहा वेळा आपण कोणासाठी तरी जीव ओतून काहीतरी करतो; आणि अकराव्या वेळेला जर थोडी कुचराई झाली, तर निदान हा माणूस मुद्दाम असे करणार नाही इतकी खातरी समोरच्याच्या मनात निर्माण होते ती फक्त आधी दहा वेळा जीव ओतून केलेल्या गोष्टींमुळे.
सॅम बाल्डविन (टॉम हँक्स) हा एक मध्यमवयीन पुरुष आपल्या पत्नीला गमावल्यानंतर आपल्या ७–८ वर्षांचा मुलगा जोनाहसोबत सिएटलला स्थलांतर करतो. पत्नीच्या मृत्यूला दीड वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असतानाही सॅम अजूनही तिच्या आठवणीत हरवलेला असतो. आपल्या वडिलांसाठी नवी पत्नी आणि स्वतःसाठी नवी आई शोधण्याच्या उद्देशाने जोनाह एका रेडिओ शोला फोन करतो. त्या शोचं नाव असतं “Sleepless in Seattle”.