सर्दी (रस : बीभत्स)
शेजारचा राजू माझ्याच वयाचा.
नेहमीच आमच्याकडे यायचा.
त्याला वारंवार व्हायची सर्दी.
नाकात व्हायची मग भलतीच गर्दी
सोबत शुभ्र रुमाल असायचा.
सारखा सारखा नाक पुसायचा.
एकदा आला आमच्याकडे टोकाची सर्दी घेऊन.
आणि नेमका रुमाल घरी विसरुन.
सर्दीने झाला होता प्रचंड बेजार..
खेळाचा वगैरे सुचतही नव्हता विचार..
अशातच त्याला एक मोठी शिंक आली.
नेहेमीच्या सवयीने ओंजळ नाकावर गेली.
पाठोपाठ तीन चार जोरदार शिंका आल्या
आणि उजवी ओंजळ भरुन गेल्या.
80's Look हा ट्रेंड गेल्या दोन-तीन दिवसांत सोशल मीडियावर इतका वायरल झालाय की वाटतंय आपण पुन्हा 80's मध्येच पोहोचलो की काय 
गंमत म्हणजे या ट्रेंडमध्ये Gen Z आणि Gen Alpha पेक्षा आपली Millennials आणि Gen X पब्लिक जास्त उत्साहाने उतरली आहेत. अर्थातच, ज्यांनी तो काळ पाहिलाय, त्यांनाच त्याची खरी मजा 
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
शीर्षक वाचून तुम्हांला कळलंच असेल की काय करायचं आहे! एरवी व्हॉट्स अॅप वर आलेल्या फॉर्वर्ड करायच्या मेसेजेसची , संदेशांची किंवा ढकलपत्रांची चिरफाड करण्यात आणि त्यातील विचारांची टर उडवण्यात मजा येते ना?
पण या गंमतखेळाच्या निमित्ताने आपण असे मेसेजेस / संदेश लिहायचे आहेत.
हा गंमतखेळ आहे. स्पर्धा किंवा उपक्रम नाही. त्यामुळे अटी फार नाहीत.
१. किमान शंभर शब्द लिहा.
२. संदेशात "आयुष्याचंही असंच असतं" हे शब्द आले पाहिजेत.
तुमचे फॉर्वर्ड्स किंवा ढकलपत्रे याच धाग्यावर प्रतिसादांत लिहा.
बिट्टू तबाही - जलप्रदूषणाचा विनाश!

वरील चित्रात दिसत आहे ती एक छोटीशी नदी होती. तिचा लोकांनी कचरा टाकून नाला केला. कालांतराने नाला सुद्धा कचऱ्याने तुंबून गेला.
मग एक वीस वर्षाचा पोरगा बिट्टू तबाही आपल्या मित्रांसह त्या प्रदूषित नदीत उतरला. ना हातमोजे, ना बूट, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोहता देखील येत नसताना त्याने स्वतःहून ती नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. हे असले काही अचाट खूळ मुळात डोक्यात येते कुठून याचेच मला आश्चर्य वाटले.
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा
तरीसुद्धा,
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
चहा बिहा विकलात तरी
प्रेम करता येतं;
डून स्कूलला शिकलात तरी
प्रेम करता येतं !
जंतर मंतर हुकलात तरी
प्रेम करता येतं
पुणे म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
छात्रो , मित्रों 'सेम' असतं !
"नमस्कार मंडळी,
नाष्टा घ्या"
याच वाक्याने सुरुवात करुन वाड्यावरील गप्पा या वाहत्या पानावर मी fruit plates टाकायला सुरुवात केली होती. त्याला आता एक दोन वर्षे झाली. वाडेकरांनी व मायबोली मित्र परिवार सदस्यांनी अनेकदा केलेल्या कौतुकामुळे मला हुरुप येत गेला व माझीही यातली रूची वाढत गेली.
जसे मायबोली नसती तर मी कधीही कसलेल्ही लिखाण केले नसते तसेच मायबोली नसती तर मी हे पण कदाचित एवढ्या उत्साहाने कधी केले नसते.
या मागील काही दिवसात केलेल्या नवीन fruit dishes.
गोड मानून घ्या.
१.
२१ वर्षात २५ ट्रान्सफर!
महाराष्ट्राचे सिंघम!
ते अजून आपल्यात आहेत हीच एक अचिव्हमेंट.
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये थोडीफार वरवरची साफसफाई आणि खोलात शिरताच बदली.
पुन्हा काही काळात जैसे थे!
जसे इलास्टिक थोडे ताणले आणि सोडले की पुन्हा पूर्ववत होते.
मला माहित आहे त्याप्रमाणे अॅडमिन, झारा, अनुदोन, आस्चिग, रायगड ही मंडळी नक्की असणार आहेत. अजून कोण कोण येत आहे ?
आमची ग्रीड भरगच्च आहे! शुक्रवारी 'ऑल द बेस्ट' नाटकाच्या आधी 'कमलाबाई ओगले भोजनगृहात' भेटायचं का?
समिर, सुप्रिया, अनु ह्यांचा मोगरा फुलला कार्यक्रम आणि त्यांचीच एकांकिका शनिवारी आहे. ती झाल्यावरही भेटू शकतो पण मग तेव्हा फोक आख्यानची गडबड असेल.
टीप - एका बैठकीत वाचता आले नाही तरी पुढच्या वेळी शोधणे शक्य व्हावे यासाठी भाग पाडले आहेत.
भाग १: गूढ सिग्नल
वर्ष २०४५.
कॅनडाच्या बर्फाच्छादित जंगलांमध्ये वसलेल्या अपेक्स-आर या अथांग रेडिओ टेलिस्कोप डिशवर रात्रीचा गडद अंधार पसरला होता. बाहेर उणे २० अंश सेल्सिअस तापमान होते, पण कंट्रोल रूममध्ये मात्र वातावरण प्रचंड तापले होते.