त्रिपदी' हा श्री. गो. नी. दाण्डेकर यांच्या चोखंदळपणे निवडलेल्या स्फुटलेखांचा नवीन संग्रह.या लेखांची प्रकृती लक्षात घेता या लेखांची सामान्यतः व्याक्तिविषयक, आत्मपर आणि ललितलेख अशी विभागणी करता येईल. म्हणून या लेखांच्या संग्रहाचं नाव 'त्रिपदी'.
या स्फुटलेखसंग्रहातील हा एक लेख. शीर्षक - 'माझी बायको'.
या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण खास आपल्यासाठी..
आमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.
'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
'मायबोली गणेशोत्सव : हमखास यशस्वी पाककृती' मध्ये सांगितल्याप्रमाणे भरपूर उत्साह, आवडीनुसार कल्पनाशक्ती, विनोदाचा मसाला, कोपरखळ्यांची फोडणी, दाद आणि प्रतिसादांची सजावट आणि रांधायला-वाढायला-चाखायला
लेखण्या, कॅमेरे, झारे, कढया, चॉपस्टिक्स आणि रंगपेट्या हे सगळे घटक पदार्थ घेऊन साजरा केलेला गणेशोत्सव दणक्यात साजरा न होता तरच नवल !!!
दिवाळीतली पहिली पहाट उजाडली. पणत्यांच्या रांगा, दारापुढील रांगोळी, आकाशदिवा.. घर मोठे देखणे दिसत आहे. स्नानगंधा-उटणे-चिरांटे आदी सोपस्कारांनी अभ्यंगस्नान झालेले आहे. बच्चेमंडळी फटाके फोडण्यात दंग झाली आहेत. ताज्या फराळाचा नैवेद्यही नुकताच दाखवून झाला. आता फक्त आस्वाद घ्यायचा आहे.. लाडू,चकल्या,शंकरपाळ्यांचा, गरमागरम चहाचा आणि..
अर्थातच नुकत्याच प्रकाशित झालेल्या मायबोली दिवाळी अंकाचा!!!!