साहित्य संमेलन

८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच महाबळेश्वर येथे पार पडले. या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. संमेलनात सहभागी झालेल्या लेखकांची भाषणे, परिसंवाद, कविसंमेलने, कथाकथन यांचा आस्वाद जगभरातील मराठी साहित्यप्रेमींना घेता यावा, हा यामागील हेतू आहे.

संमेलनातील इतर कार्यक्रम लवकरच क्रमाक्रमाने इथे आपल्याला ऐकता येतील. साहित्य संमेलनातील कार्यक्रम आंतरजालाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या या पहिल्याच प्रयत्नाचे आपण स्वागत कराल, ही अपेक्षा.

साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे श्री. आनंद परांजपे (समन्वयक, ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व अपर्णा करंदीकर (उपाध्यक्ष, चौफेर) यांनी उपलब्ध करून दिली. हे कार्यक्रम जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचवताना श्री. आनंद परांजपे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल व ही ध्वनिमुद्रणे वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांचे, तसंच डॉ. वि. भा. देशपांडे, डॉ. माधवी वैद्य, श्री. सुधीर गाडगीळ यांचे मनःपूर्वक आभार.

श्री. प्रदीप माळी (स्वरांजली), सौ. शुभदा अभ्यंकर, श्री. अंशुमान सोवनी यांच्या विशेष सहकार्याबद्दल धन्यवाद.

श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांचे भाषण

0

महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण.

KTP.jpg