kedar123 यांचे रंगीबेरंगी पान

माझी गोष्ट

आज काल माझ्या आयुष्यात काही तरी वेगळ घडतय. वेगळ म्हणजे नक्की काय ते अस सुसंगत पणे नाही सांगता येणार पण तरीही एक प्रयत्न करतो. आता हेच बघा ना मी कोण हे सांगायच्या आधीच तूम्हाला दूसरच काहीतरी सांगायला सुरूवात केली.

माजी मराठी फिल्लम बाजी

मराठी चित्रपटांना येणारी सध्याची दूरावस्था लक्षात घेता, मराठी चित्रपट उद्योगाचे पूनरज्जीवन (खरे तर पूनरुत्पादन, पूण्यवचन असे भारी भरकम शब्द आठवत होते.

बुधवारच गाण (काळ्या पिशवीत पिशवीत)

(श्री विठ्ठल वाघांची क्षमा मागून)

काळ्या पिशवीत पिशवीत बॉटल हालते
बॉटल हालते बॉटल हालते

बाईल थयथया नाचते दोस्त घरी बोलवितो
घरी बोलवितो दोस्त घरी बोलवितो

घरन बाबा हाकलतो छंदी फंदीच्या जोडीला

भूमिका

घरासमोरची वाट मिट्ट काळोखात बुडली. दूर कुठेसा दिवा दिसायला लागला तस येसू न लाकडी खिडकी ओढून घेतली खूट्टकन. देवाजवळ दिवा लावला आणि पटकन चूल पेटवून घेतली. पेजेवर झाकण ठेवून देवळाशी आली.

आजचे राशी चक्र

(मायबोलीकरांचे भविष्य कथन करण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. चू भू द्या घ्या)

सदू आणि दादू

(सदू आणि दादू नेहेमी प्रमाणेच गोदू ची वाट पहाताहेत. पण ह्यावेळी ते प्रत्यक्ष भेटत नसून माय बोलीवर भेटताहेत अश्याच कुठल्याश्या बी बी वर)

सदू : नमस्कार मंडळी. कोणी आहे का इथे (हसणारी बाहूली)

भैया हलेना

भैया हलेना भैया चालेना
भैया खंत करी काही केल्या परतेना

गेले 'जोगेश्वरी' च्या गोठी
म्हटली म्हशींसवे गाणी
आम्ही दूधात पाणी मिळवून रे

आले सप च्या मनी
अबू बरळला जनी
राजास पाहून गळाले हातपाय रे

हा तर संजय निरूपम

व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने

व्हॅलेंटाइन च्या निमीत्ताने तूला काही सांगाव म्हणतोय
जून्या आठवणीतले जूनेच डाव तूझ्याशी मांडावे म्हणतोय

आइनस्टाइनचे सिद्धांत आणि ऍरीस्टोटल ची गणित मला जमलीच नाहीत
तशी ऐन वसंतात साद घालणारी 'तू' मला कधी कळलीच नाहीस

सया म्हणे

व्रुक्षवल्ली आम्हा सोयरे मर्कटे.
ऑसी आळवीती हे रडगाणे

फळी चेंडू राहीला केवळ उपचारासी
ताबडवितो 'अनिल' आता काय करू

'हर' कथा 'भज' परवडेना विस्तार.
करूनीया कर्म उगी रहावे.

सया म्हणे आता मूढांचा संवाद
आपूलाच वाद आपुल्याशी

आमचीही एक हातोडी

(मिल्या दादा आणि देवा - एक हातोडी द्या मज आणूनी हाणून मी ती स्वहस्ताने)

भोंडल्याची गाणी (डोम्बलाची गाणी)

पात्र (वात्र) परिचय
बका- स्टीव बकनर
बना- बेन्सन
माया - माईक प्रॉक्टर
सया - सायमंडस
रेखा - रिकी पाँटींग
कला- मायकल क्लार्क