शाळेत असताना नुकतंच वर्तमानपत्र वाचायला सुरूवात केलेली तेव्हां आणिबाणी, इंदिरा गांधी, संजय गांधी, मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण ही नावं हेडींगमधे वाचून माहिती व्हायला सुरूवात झाली होती. हेडींग शाळेत सांगावी लागत. वरच्या यत्तेत गेल्यावर टिव्ही आला. तेव्हां आंधी, किस्सा कुर्सी का ही नावं माहिती झाली. यावर सतत काही ना काही कॉण्ट्रोवर्सी चालू असे. कॉलेजला पोहोचल्यावर इलस्ट्रेटेड वीकली वगैरे मधून बंदीचे संदर्भ येत. तेव्हां अर्थातच ही जुनी गोष्ट झाली होती, पण पडसाद उमटत होते, ते आजतागायत चालू आहे. आता क्षीण झाले आहेत संदर्भ.
जे चित्रपट लागले की कधीही पाहावेसे वाटतात, कोणत्याही सीनपासून पाहणे तितकेच रंजक वाटते अश्या काही चित्रपटांची (माझी) यादी!
अजून यात अनेक नावे येऊ शकतील.
धुरंधर ह्या सिनेमाने प्रचंड यश मिळवले आहे आणि अनेक डाव्या, सेक्युलर लोकांना त्यातील अनेक गोष्टी खटकताना दिसत आहेत.
एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसर्या भागात सुरवातीलाच कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असा श्लोक अनुवादासकट दाखवला होता त्यावरून काहीसा गदारोळ झाला. सिनेमात धार्मिकता कशाला हवी असा एक टीकेचा सूर काही व्यक्तींच्या बोलण्यात आला. ह्यावरून गेल्या ६०-७० वर्षे हिंदी सिनेमात दिसणारा दुटप्पीपणा चर्चिला जावा असे वाटते.
१) शाहरुख खान स्टारर आणि ऍटली दिग्दर्शित चित्रपट जवान.
२) रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट धुरंदर १ आणि २.
हे गेल्या दोन वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत.
आधी मी जवान चित्रपटाला टाळ्या शिट्ट्या आरोळ्या ऐकल्या आणि लहान मुलाना सीटवर चढून नाचताना पाहिले.
त्यानंतर मी धुरंदर पार्ट २ चित्रपटाला टाळ्या शिट्ट्या आरोळ्या ऐकल्या आणि लोकांना उभे राहून घोषणा देताना पाहिले.
'धुरंधर' - तरबेज, निपुण, प्रवीण, कुशल किंवा एखाद्या कामात अत्यंत पारंगत असलेला व्यक्ती.
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम
तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत-निश्चयः ||३७||
(अध्याय २, श्लोक ३७)
"जर तू युद्धात मारला गेलास, तर तुला स्वर्ग मिळेल; किंवा जर तू जिंकलास, तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून, हे कुंतीपुत्रा (अर्जुन), युद्ध करण्यासाठी दृढनिश्चयाने उभा राहा."
हॉरर म्हणजे काय ?
हा मला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचा वेध घेता घेता मनाचे खेळ सुरू झाले. मनाच्या या खेळाचं निरीक्षण करायला मजा येते, नाहीतर भयंकर अस्वस्थ वाटतं कधी कधी. मनाचे खेळ कधी कसे चालतील सांगता येत नाही.