राजकारण

ऍडॉल्फ हिटलर आणि दुसरे महायुद्ध: सत्य आणि विपर्यास

Submitted by मार्गी on 8 September, 2026 - 12:59

✪ नाझी जर्मनी आणि युद्धासंदर्भातील वेगळी बाजू
✪ भूगोलाबरोबर इतिहासातही वेगळं स्थान असलेला देश
✪ आसुरी महत्त्वाकांक्षा असूनही एकही वसाहत नसलेला देश
✪ लोकशाहीवादी देशांनी केलेली आक्रमणं, जुलुमशाही आणि छळ
✪ महायुद्धाचा खरा सूत्रधार कोण?
✪ रशियामध्ये जर्मनीचा पराभव होण्यामागचं वेगळं कारण
✪ ब्रिटन व अमेरिकेचं नंतरच्या काळातलं वागणं

शब्दखुणा: 

मोदी सरकार २.५

Submitted by भरत. on 2 September, 2026 - 02:27

तिसर्‍या मोदी सरकारचा अर्धा कार्यकाल पूर्ण होत आला. म्हणून २.५.

देशपातळीवरच्या राजकारणाची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 

घर मे घुसकर मारेंगे, चीनको अतिथी देवो भव कहेंगे - नया भारत है ये!

Submitted by राज अज्ञानी on 13 August, 2026 - 10:45

(आंतरराष्ट्रीय राजकारण असा विषय दिलेला नाही. त्यामुळे राजकारण हा विषय सिलेक्ट करावा लागला आहे.)

"चीन कि लांल आंखों मे आंख डालकर देखने कि जरूरत है."
"ये नया भारत है, घर मे घुसकर मारता है."

ही वाक्यं ऐकल्याला खूप काळ नसेल लोटला. कदाचित सत्तापरिवर्तन झाल्यानंतर अनेक लोक विसरून गेले असतील. पण काही जणांनी ही वाक्यं कोरून ठेवली असतील.

अधून मधून पाकिस्तानमधे हल्ले केल्यानंतर यह नया भारत है चा गजर ऐकू आला. यावरच खूष होणारी जनता आहे. मात्र जसा चीनचा विषय येतो , त्या वेळी सगळीकडे सामसूम असते. एक भयाण शांतता जाणवू लागते.

शब्दखुणा: 

राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरण

Submitted by उदय on 2 August, 2026 - 03:57

१९८० पासून राम मंदिर प्रश्न आपल्या सर्वांच्याच कानावर सतत पडत असतो. राम मंदिर विषय निघाल्यावर संबंधित घटनाक्रम ( १९८६ कुलूप उघडणे, रथयात्रा, दंगली, ढाचा पाडणे, अनेक दंगली, रक्तपांत, मंदिराचे निर्माण कार्य, भूमीपूजन, जोशांत उद्घाटन) माझ्या डोळ्यासमोर येतो. मंदिर निर्माण होण्याच्या अगोदरच्या काळांत, अनेक दशके, देणग्या गोळा करण्याचे काम सातत्याने सुरु होते, आणि पुढेही ते सुरुच रहाणार आहे.

गडकरींच्या विरोधात निदर्शने - बळीचा बकरा?

Submitted by राज अज्ञानी on 4 July, 2026 - 15:58

पेट्रोल मधे इथेनॉल किती असावं हे ठरवणे हे पेट्रोलियम मंत्रालयाचे काम आहे. गडकरी हे पेट्रोलियम मंत्री नक्कीच नाहीत.

पण जेव्हांपासून भाजप सत्तेत आलेली आहे तेव्हांपासून गडकरी इथेनॉलचे फायदे सांगत आहेत. पूर्वी ते फ्लेक्स इंजिन बद्दल बोलत होते. मग हळूहळू शेतकर्‍यांना फायदा करून देण्यासाठी इथेनॉलचे धोरण आखल्याचे सांगू लागले. पेट्रोलियम मंत्रालयाकडून याबाबतीत कधीही कसलेली विधान आलेले नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

आशा अमर...

Submitted by अनन्त्_यात्री on 25 June, 2026 - 06:19

माय मराठीचे पांग
त्यांनी परवा फेडले
उच्चारांची ऐसी तैसी
त्यांना कोणी ना रोखले

श्रद्धांजलीचा कागद
त्यात आधी होती भेळ
त्यात फॉन्ट होता छोटा
मग झाला थोडा घोळ

महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड एका राज्याचे कंपनीत रूपांतर आणि सामूहिक प्रज्ञेच्या ऱ्हासाची मीमांसा

Submitted by ultimatebipin on 18 June, 2026 - 07:16

"महाराष्ट्र राज्य प्रायव्हेट लिमिटेड" हे केवळ एक उपरोधिक रूपक नाही. उलट, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रवासाचे विश्लेषण करण्यासाठी ही एक अत्यंत उपयुक्त चौकट आहे. कारण एखाद्या लोकशाही राज्याकडे जर आपण कंपनी म्हणून पाहिले, तर अनेक विसंगती अचानक स्पष्ट दिसू लागतात.

मढ्यांशी भांडतो आम्ही

Submitted by भरत. on 11 May, 2026 - 11:11

जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…

सुरेश भटांनी या ओळी लिहिल्या.
पण सध्याचे आपले राज्यकर्ते आणि त्यां च्या पाठिराख्यांकडे वर्तमानाबद्दल बोलण्यासारखं कधी काही नसतं. ते कायम इतिहासात गढलेले असतात. बाबर- अकबर ते औरंगजेब , अफझलखान ते टिपू आणि नेहरू ते इंदिरा यांच्या मढ्यांशी भांडत असतात.
मढ्यांशी भांडतो आम्ही हे शब्द फार आवडले आणि सुरेश भटांच्या गझलेच्या जमिनीतच ही गझल किंवा हजल ऑर्डर देऊन लिहून घेतली आहे.

स्वतःची लाल करताना दुजा भंडावतो आम्ही
कधीपासून पुरलेल्या मढ्यांशी भांडतो आम्ही

विषय: 
शब्दखुणा: 

द्वेष

Submitted by रेव्यु on 8 May, 2026 - 00:16

हे विसाव्या शतकातील प्रसिद्ध कवयित्री विसलावा शिम्बोर्स्का यांच्या 'Hate' (नफरत) या कवितेचे मराठी भाषांतर:
बघा, ती अजूनही किती चपळ आणि प्रभावी आहे
आपल्या शतकातील ही 'द्वेष' नावाची भावना,
किती सहजपणे चक्काचूर करते ती
मोठ्यातल्या मोठ्या अडथळ्यांचा!
किती वेगाने झडप घालून
आपल्याला विळख्यात घेते!
इतर भावनांपेक्षा ती किती वेगळी आहे --
एकाच वेळी वृद्ध आणि तरुण सुद्धा.
ज्या कारणांमुळे तिचा जन्म झाला,
त्या कारणांना ती स्वतःच पुन्हा जन्म देते.
जर ती कधी झोपलीच, तरी ती झोप कायमची नसते,

महिला आरक्षण विधेयक - (आता पूर्ण)

Submitted by भरत. on 20 April, 2026 - 09:00

गेले चारपाच दिवस महिला आरक्षण विधेयकाची चर्चा यत्र तत्र सर्वत्र सुरू आहे. अगदी ज्यांना राजकारणात काही रस नाही किंवा आम्हांला यातलं काही कळत नाही, असं म्हणणारेही याबद्दल बोलताना दिसताहेत.

पायरीपायरीने जाऊ.

महिलांसाठी लोकसभा व विधानसभांत आरक्षण

१९९२ च्या ७३ घटनादुरुस्ती कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक रूप मिळाले व स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी १/३ जागा राखीव झाल्या. काही राज्यांनी पुढे या जागा ५०% केल्या.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राजकारण