संगीत

भरून पावली वारी माझी

Submitted by स्मिता श्रीपाद on 27 July, 2026 - 07:35

8874fffb-785c-4665-9a30-f44fa2436d0f.png

स्वरसेतूची पहिली रचना "सावळा विठोबा" ला सर्वांचे खूप प्रेम मिळाले.
विठुरायाच्या वारीसोबत स्वरसेतूची सुरुवात झाली.
यावर्षीची आषाढी वारी आम्ही भरून पावलो.
याच भावनेतून स्फुरलेलं स्वरसेतूचं दुसरं गीत...." भरून पावली वारी माझी "

https://www.youtube.com/watch?v=uTeVPZyrAV4

विषय: 

सावळा विठोबा, साजिरी रखुमाई

Submitted by स्मिता श्रीपाद on 17 July, 2026 - 08:29

https://www.youtube.com/watch?v=Gk7PLm2I3To

नमस्कार,

मी दरवर्षी पालख्यांचं दर्शन घ्यायला एफ सी रोडवर जाते. माऊलींची पालखी, त्याच्या पुढे मागे चालणार्‍या दिंड्या, त्यातले भोळे भाबडे वारकरी, कोणी डोक्यावर तुळस घेतलेली असते तर विठ्ठल रखुमाई ची मुर्ती घेतलेली असते. हातात टाळ, मुखी विठुरायाचं नाव आणि एका लयीत पडणारी पावलं हे सगळं दृश्य पुढे अनेक दिवस डोळ्यांपुढे दिसत राहातं.
दरवर्षी पुण्यात येणारा पालखी सोहळा बघुन गेल्या वर्षी काही ओळी लिहिल्या

विषय: 

ना तो कारवाँ की तलाश है….. “इश्क़ : स्वतःला हरवून सापडण्याचा प्रवास”

Posted
2 months ago
शेवटचा प्रतिसाद
2 months ago

काही गाणी अशी असतात की ती मनात निवांतपणे घर करून राहतात; पण त्यांचे खरे अर्थ मात्र काळाच्या ओघात, अनुभवांच्या साठ्याने आणि वयाच्या परिपक्वतेने हळूहळू उलगडत जातात. “बरसात की रात” मधली ही कव्वाली त्यातलीच एक.

लहानपणी बाबा जेव्हा हे गाणं लावायचे, तेव्हा मनात फक्त एकच विचार यायचा तो म्हणजे “कायच्या काय मोठ्ठं गाणं आहे!” ते ऐकण्याचाही कंटाळा यायचा. त्या वेळेस त्यातलं गूढ, त्याची खोली किंवा त्याचा आत्मा काहीच स्पर्शून जात नव्हता. मनात उमटणारा एकच शब्द “रटाळ!”

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

बुगडी माझी सांडली गं... (दागदागिन्यांचे उल्लेख असलेली गाणी )

Submitted by स्वाती_आंबोळे on 8 May, 2026 - 08:47

आता तुम्हाला हा खेळ माहिती झाला आहे, तेव्हा नव्याने त्याबद्दल लिहीत नाही.
मला पटकन आठवलेली गाणी लिहून सुरुवात करून देते.

विषय: 
शब्दखुणा: 

पल पल दिल के पास ...

Submitted by विशाल कुलकर्णी on 21 February, 2026 - 02:56

"देखिए, जाने अनजाने मुझसे एक बदतमीज़ी हो गई है। मैं कोई गीतकार तो नहीं हूं। लेकिन मैंने इस गाने का मुखड़ा लिख दिया है।"
विजय आनंद उर्फ गोल्डीचे ते विधान ऐकून गीतकार राजेंद्र कृष्णजी हळूच हसले आणि त्याच्याकडे एकटक बघत राहिले...
..............

१९७३ सालची गोष्ट. दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांना सांगितले होते, "हे गाणं मला असं असायला हवंय, की जे बघताना, ऐकताना असे वाटेल की जणु काही पत्रं (letters) बोलत आहेत."

विषय: 

परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला...

Submitted by विशाल कुलकर्णी on 10 February, 2026 - 23:58

“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला” हे नाट्यगीत निव्वळ एक गीत म्हणून न उरता, मराठी रंगभूमीच्या इतिहासात एका खोल, अस्वस्थ आणि विचारप्रवर्तक अनुभवाच्या रूपात ठामपणे पाय रोवून उभे आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार वीर वामनराव जोशी यांनी १९२७ साली लिहिलेल्या रणदुंदुभि या नाटकातील हे नाट्यगीत. त्या काळातील समाजमन, पारतंत्र्याची वेदना आणि मानवी विवशतेची जाणीव, असहाय्यतेची भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त करणारे, मराठी नाट्यसंगीताच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेले हे अजरामर गाणे.

शब्दखुणा: 

संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट

Submitted by मनोलय ... on 31 January, 2026 - 22:28

*संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट*
(कदाचित, एक टर्निंग पॉईंट …)

माझा मित्र विनायक रानडे…
हा माणूस म्हणजे भन्नाट कल्पनांच्या खजिन्याचा मालक. त्याच्या डोक्यात कल्पना जन्म घेतात, त्या मोठ्या होतात आणि क्षणात एखाद्या आनंदी धबधब्यासारख्या बाहेरही पडतात. आमच्या नाशिकमध्ये दरवर्षी होणाऱ्या अष्टौप्रहर स्वरहोत्र या संगीत महोत्सवात तो भन्नाट कल्पनेची एखादी नवी खिडकी अशी काही उघडतो की त्यातून काहीतरी नवीन फंडा शिकायला मिळतो … यंदाच्या वर्षी त्याने उघडलेली खिडकी होती—

*“संगीत मैफिलीचा सेल्फी पॉईंट.”*

हुस्ना

Submitted by वावे on 22 December, 2025 - 03:24

हुस्ना

काही काही गाणी अशी असतात की ती ऐकण्याची आपल्याला काही काळासाठी तरी चटक लागते. 'हुस्ना' हे गाणं ऐकण्याची मला गेले अनेक दिवस चटक लागली आहे असं म्हणायला हरकत नाही! Happy

विषय: 

स्मरण यात्रा हा मराठी गायनाचा कार्यक्रम

Submitted by Koustubhkp on 15 December, 2025 - 06:11

साधारणपणे १९९० साली मुंबई दुरदर्शन वर स्मरणयात्रा हा मराठी गीत गायनाचा सुरेख कार्यक्रम सादर झाला होता . त्या कार्यक्रमाची CD VCD कुठे मिळू शकेल .

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - संगीत