लेखन

रेडी गणपती मंदिर , रेडी , तालुका वेंगुर्ला

Submitted by sumukh on 30 May, 2026 - 00:39

रेडी तसे परिचित ठिकाण आणि ईतीहास देखील परिचित कोकण तसे मासे आणि समुद्र याच साठी आजही परिचित आहे पण पण रेडी मात्र कोकणतातील एक गांव पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी (जवळील त्या काळी असलेले मोठे संस्थान) मात्र रेडी ची ओळख ही गणेश मंदिर म्हणून फार आजही कमी आहे आणि सोबत च्या यशवंत गड साठी यशवंतगड तसा रेडी च्या किल्ला याच नावाने परिचित आणि जुनी ओळख रेडी बंदर अथवा रेवती बंदर वास्तविक हा सगळा इतिहास मधील बंदर मधील भाग येतो तेव्हाच रेडी बंदर चा उल्लेख येतो.

विषय: 
शब्दखुणा: 

कौन ? डोन्ट ओपन द डोअर (माझ्या घरी घडलेला २६ तासाचा थरार ) : भाग २

Submitted by दीपांजली on 29 May, 2026 - 12:36

पोर्टर रॅन्चची ओळख भाग १ मधे झाली, आता बॅक टु २२ मे ची दुपार !

शब्दखुणा: 

कौन ? डोन्ट ओपन द डोअर (माझ्या घरी घडलेला २६ तासाचा थरार ) : भाग १ .

Submitted by दीपांजली on 29 May, 2026 - 03:45

चॅप्टर १ : स्ट्रेन्जर इन माय हाउस
साधारण १९९९-२००० च्या आसपास राम गोपाल वर्मा-उर्मिला मातोंडकर-मनोज वाजपेयी या जबराट कॉकटेलचा अत्यंत स्केअरी थ्रिलर मुव्ही आला होता, ‘कौन’ !
एका रात्री उर्मिलाच्या घरात एक स्ट्रेन्जर घुसतो आणि सुरु होतो एक लपाछपीचा ट्विस्टस ने भरलेला थरार.. नक्की कोण कोणाला थ्रेट आहे, कोण कोणाला घाबरतय..प्रेक्षक पार कनफ्युज होतात !
तसाच काहीसा थरार गेल्या शुक्रवारी आम्ही अनुभवला !
२२ मे २०२६
मेमोरिअल डे लाँग विकेन्ड असल्यामुळे शुक्रवार दुपार पासूनच सगळीकडे सुट्टीचं वातावरण होतं !

शब्दखुणा: 

वेदना माझी जगाला मी दिसू नाही दिली : स्वच्छंदी

Submitted by 'स्वच्छंदी on 24 May, 2026 - 08:09

पापणी भरली परंतू........ओघळू नाही दिली
वेदना माझी जगाला मी दिसू नाही दिली

वेदनेला येत राहिल गंध विरहाचा तुझ्या
याचसाठी ही जखम मी भळभळू नाही दिली

मी अशा जादूगिरीने विरह होता सोसला
चेहऱ्यावर रेघ साधी मी उठू नाही दिली

त्या जगाने कापणी केली सुगीची नेमकी
ज्या जगाने ओल बेन्याला मिळू नाही दिली

वेदनांची जन्मभर केली जरी पारायणे
मी सुखाची एक ओंजळ दरवळू नाही दिली

घेतली जाणून माझ्या जिंदगीची वास्तवे
तू स्वतःची मात्र धडधड जाणवू नाही दिली

'माणसां'मध्ये म्हणूनच मोजला जातोय मी
मी कुणाला जात माझी ओळखू नाही दिली

शब्दखुणा: 

माझी मराठी माध्यम शाळा

Submitted by sumukh on 23 May, 2026 - 00:35

गेल्याच आठवड्यात क्रांतीज्योती विद्यालय ( मराठी माध्यम ) हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि ते दिवस माझ्या समोर आले शाळेत तेव्हा मिळत असलेला बाबू चा वडापाव शाळेत असलेले आमचे आवडीचे चित्रकला चे चोणकर सर आणि काही से न आवडणारे सहस्त्रबुद्धे सर ( आणि मुख्याध्यापक देखील ) आणि अतिशय कठोर शिस्तीच्या काही बाई अर्थात तेव्हा ठेवलेली आमची टोपण नाव . अनेक अशा आठवणी तराळून गेल्या आणि सोबत आठवल ते आजच्या मुलाची आवडती मीमीक्री आणि सोबत साने गुरुजी ची खरा तो एकची धर्म ही कविता .

विषय: 
शब्दखुणा: 

माझी मराठी माध्यम शाळा

Submitted by sumukh on 23 May, 2026 - 00:35

गेल्याच आठवड्यात क्रांतीज्योती विद्यालय ( मराठी माध्यम ) हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि ते दिवस माझ्या समोर आले शाळेत तेव्हा मिळत असलेला बाबू चा वडापाव शाळेत असलेले आमचे आवडीचे चित्रकला चे चोणकर सर आणि काही से न आवडणारे सहस्त्रबुद्धे सर ( आणि मुख्याध्यापक देखील ) आणि अतिशय कठोर शिस्तीच्या काही बाई अर्थात तेव्हा ठेवलेली आमची टोपण नाव . अनेक अशा आठवणी तराळून गेल्या आणि सोबत आठवल ते आजच्या मुलाची आवडती मीमीक्री आणि सोबत साने गुरुजी ची खरा तो एकची धर्म ही कविता .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कहां गए वो लोग

Submitted by पशुपत on 20 May, 2026 - 07:56

साधारण पंधरा-सोळा वर्षांपासून मी मायबोलीचा नियमित वाचक आहे . वेळ मिळेल तसा आणि मूड लागेल तसा इथल्या साहित्याचा आस्वाद मी घेत आलो आहे. फक्त त्यात सलगता राहिलेली नाही.
म्हणजे असं की नेहमी किंवा रोज इथे येऊन नवीन लेखन कोणी केले आहे याचा धांडोळा घेऊन वाचत राहिलो तर नियमित लिखाण करणाऱ्या लेखकांची मनात एक प्रतिमा तयार होते . आपल्याला कोणाचे लेखन आवडत आहे याचे ठोकताळे तयार होतात आणि मग आपण त्यांचं नवीन लेखन कधी येते याची वाट पाहू लागतो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन