पाककृती स्पर्धा क्रमांक १ (जिन्नस एक, पदार्थ अनेक) – शर्मिला. – सणासुदीचं ताट, बेसनाचा थाट!
सणासुदीचं ताट, बेसनाचा थाट!
बेसनपोळी (वर तुपाचा गोळा), अळूच्या वड्या, कढी-पकोडे/बच्चू-कढी, भजी.
(फाउल नको म्हणून सणा-सुदीचे बाकीचे कलाकार फोटो काढून झाल्यावर पानात आले.)
ह्यातील बेसनपोळ्या आणि अळूच्या वड्यांचे लोंढे आदल्या दिवशी तयार करून ठेवता येतात. त्यामुळे पाहुणे येणार असतील तर हा बेत खूप सोयीचा होतो.
