इतिहास

२५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन २०२२

Submitted by bvijaykumar on 24 January, 2022 - 07:01

भारत निवडणूक आयोगाची २५ जानेवारी १९५० रोजी स्थापना झाली . हा दिवस संपूर्ण देशभरात ''राष्ट्रीय मतदार दिन'' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतात होणारी प्रत्येक निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. दिवसेंदिवस मतदानाविषयी वाढणारी उदासीनता व मतदानाचा घसरणारा टक्का यामुळे निवडणुकीत लोकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने २०११ पासून भारत सरकारने भारत निवडणूक आयोगाचा स्थापना दिन २५ जानेवारी हा दिवस "राष्ट्रीय मतदार दिन" म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

विषय: 

व्हिक्टोरिया राणीचा पुतळा

Submitted by प्रसाद70 on 22 January, 2022 - 05:43

व्हिक्टोरिया राणीचा पुतळा
हिरा यांनी प्रतिसाद देताना उल्लेख केलेला व्हिक्टोरिया राणीचा बसलेल्या स्थितीत असलेल्या राणीच्या पुतळ्याबद्दल ची हि माहिती.

विषय: 

एक अपरिचित प्रकाशन

Submitted by पराग१२२६३ on 7 January, 2022 - 22:47

SS2.jpg

भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे.

पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास

Submitted by Kadamahesh on 11 September, 2021 - 15:45

पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास
"वार्ता विघ्नाची" म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२० साली ३४४ वर्ष पूर्ण होतं आहेत.

विषय: 

तालिबानची  सुरुवात, अंत आणि उदय (१)

Submitted by स्वेन on 6 September, 2021 - 08:09

तालिबानची  सुरुवात, अंत आणि उदय

अफगाणिस्तान - एक शोकांतिका ( भाग ०३ )

Submitted by Theurbannomad on 17 August, 2021 - 08:59

एकोणिसाव्या शतकापर्यंत मध्यपूर्व, मध्य आशिया, भारत आणि चीन या भागांमध्ये प्रचंड उलथापालथ झालेली होती. एक तर युरोपच्या साम्राज्यवादी सत्ता हळू हळू जगभर पाताळयंत्री पध्दतीने व्यापाराच्या आडून आपलं साम्राज्य विस्तारत होत्या. आपापसात लढण्यात मश्गूल असलेले राजे - सुलतान - शेहेंशाह वगैरे एव्हाना लढून लढून मेटाकुटीला आले होते. मराठे, तुर्की, अफगाण, उझबेक, मुघल वगैरे शाह्या पूर्वीसारख्या एकसंध आणि प्रबळ उरल्या नव्हत्या. अफगाणिस्तानात एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यातल्या त्यात प्रबळ होते बरकाझाई कबील्याचे लोक, ज्यांचा प्रमुख होता फतेखान.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास