इतिहास

बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्री. निलेश ओक यांच्याशी संवाद

Submitted by Ashwini Kshirsagar on 25 July, 2026 - 23:12
बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते श्री. निलेश ओक

बीएमएम २०२६ अधिवेशनातील मान्यवर वक्ते इतिहास संशोधक आणि अभ्यासक श्री. निलेश ओक यांच्याशी संवाद
त्यांची थोडक्यात ओळख:

विषय: 

लाहोर भारतात?

Submitted by सुपरचार्ज on 11 July, 2026 - 08:40

लाहोर भारतात असते तर आज वेगळा इतिहास असता का? भारताला फायदा/तोटा काय असता? पंजाबची राजधानी पाकिस्तानला जाणे हा पंजाब शीख ह्यांच्यासाठी धक्का होता का?

विषय: 

पुस्तक परिचय- महाराष्ट्राची धारातीर्थे (किल्ले). लेखक - पं. महादेवशास्त्री जोशी

Submitted by वावे on 7 June, 2026 - 13:53

भारदस्त, तरीही जड नसलेली, सौष्ठवसंपन्न, तरीही शब्दांचे फुलोरे नसलेली, अभिमानाने ओतप्रोत, तरीही तोल न ढळलेली अशी भाषा, ज्ञानी, व्यासंगी लेखक आणि महाराष्ट्रातील किल्ले हा विषय. मला पुस्तक न आवडण्याचा काही प्रश्नच नाही. Happy पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७५ ची आहे आणि ही दुसरी आवृत्ती २०१० ची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

इस्रायल

Submitted by भरत. on 5 April, 2026 - 08:05

इस्रायलबद्दलची वाचनात आलेली आणि लक्षात राहिलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यूचा नरसंहार करून अन्य देशांत नाव बदलून लपून बसलेल्या नाझी अधिकार्‍याला पकडून आणून शिक्षा देणं. रीडर्स डायजेस्टमध्ये शेवटचं सदर एखाद्या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती हे असतं. त्यात हे वाचलं होतं.

शब्दखुणा: 

मुस्लिम दहशतवाद - एक अमेरिकन बागुलबुवा

Submitted by राज अज्ञानी on 23 March, 2026 - 05:09

प्रस्तावना

जगभरात "इस्लामी दहशतवाद" हा शब्द आज इतका रूढ झाला आहे की त्याबद्दल प्रश्न विचारणे अनेकांना धोकादायक वाटते. पण हा दहशतवाद नेमका कुठून आला? तो उत्स्फूर्तपणे जन्मला, की त्याला जन्म देणारे, वाढवणारे, शस्त्रे पुरवणारे आणि नंतर त्याचाच बागुलबुवा करून स्वतःच्या परराष्ट्र धोरणाला न्याय देणारे अदृश्य हात यामागे होते?

विषय: 

घाटाचा पहारेकरी किल्ले राजमाची

Submitted by ferfatka on 25 February, 2026 - 00:00

IMG_20260219_120520 copy.jpgआज शिवजयंती. १९ फेब्रुवारी २०२६. वर्दळीपासून थोडा दूर व मोजकेच दुर्ग प्रेमी व पर्यटक जात असलेल्या लोणावळ्याजवळील राजमाची दुर्ग पाहण्यास निघालो. मुंबईला जाताना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खंडाळ्याचा घाट सुरु होताना राजमाची पॉर्इंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच हा राजमाची किल्ला. लोणावळ्यापासून खंडाळाच्या दिशेने जाताना (उजव्या हाताल) कुणे नामा या गावाचा फाटा लागतो. हाच रस्ता पुढे राजमाचीला जाण्याचा मार्ग आहे.

विषय: 

मंडपेश्वर शैव लेणी - हेरिटेज वॉक

Submitted by सामी on 10 February, 2026 - 13:37
मंडपेश्वर शैव लेणी

भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भागआरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.

विषय: 

धर्माची शिकवण काय सांगते ?

Submitted by राज अज्ञानी on 25 December, 2025 - 05:26

आधीच्या धाग्यावर बर्‍याच अंशी मुद्देसूद चर्चा झाली आहे.

यात एका सदस्याने हा प्रतिसाद दिला आहे. त्या वर उत्तर देताना धागा भरकटू नये असे उत्तर द्यावे लागले आहे. मात्र विवेकवादी माणसाला पडणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न बामियान इथे तालिबानने फोडलेल्या मूर्त्यांसंदर्भात आहे.

शब्दखुणा: 

चोराची आक्रांतवाडीतला उपक्रम

Submitted by एक लेखक on 10 December, 2025 - 08:51

चोराची आक्रांतवाडीतल्या नव्या पिढीकडे आता मोबाईल आले होते. तरी त्यांचा डीएनए काही बदललेला नव्हता.

पुण्या मुंबईत काही खुट्टं झालं कि आपलं गाव मागं राहू नये ही इच्छा तशी स्वाभाविकच होती.
कालच हाणबा मगरनं पिल्लू सोडून दिलं होतं.
हाणबानं जयसिंगराव देशमुखांच्या वाड्यावर जायला सुरूवात केल्यापासनं आपल्याला गावात मान मिळतोय असं त्याला वाटत होतं. म्हणून माझा उल्लेख आता हाणबा असं न करता हनुमंतराव असा करावा असं तो ज्याला त्याला सांगत सुटला होता.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास