"कायापालट - द मेक ओव्हर" अर्थातच विडंबन स्पर्धा क्र. ४
स्पर्धेचे नियम :
१. दर चार दिवसांनी एक कविता दिली जाईल, तिचे विडंबन करायचे आहे.
२. विडंबन मराठी भाषेतच केले जावे.
३. एका आयडीला एका कवितेचे फक्त एकच विडंबन करणे अपेक्षित आहे.
४. एका आयडीला, एकूण दिल्या जाणार्या चारही कवितांचे विडंबन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
५. विडंबन करताना शक्यतो वृत्त, गण ह्यांचे नियम पाळून करावे असा आग्रह आहे पण बंधन नाही. मूळ कविता ज्या प्रकारात आहे, त्याच प्रकारात विडंबन पण आले तर उत्तम!!
६. विडंबनाला शीर्षक देणे बंधनकारक आहे.
७. विडंबन अश्लील किंवा बिभत्स नसावे.
८. विडंबनात वैयक्तीक टीका नसावी.