प्रवेशिका १ : पाचक हझल
मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी
गंध वनाचे क्षणाक्षणाला बदलत होते
कुणीतरी अस्वस्थ असावे समजत होते
आज अचानक काय बिनसले असेल ह्याचे
काल जयाचे तोंड गपापा हदडत होते
मी काही ठरवून कंट्रोल गमवत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते
फुकाच होती सुरू तिथे ती चर्चा नक्की
हाजमोल्याशिवाय कोणास करमत होते ?
प्रकृती अता कशी ? हे आता पुसणेच नको
पुसताना पाहिले का ? मनी चरकत होते
आज करत प्रतिज्ञा लंघन लिंबूपाण्याच्या
एवढ्याने काय होते ? काल बरळत होते
करावे तसे भरावे व भोगावीत फळे
नरवर बघता सर्व पूर्णतः सहमत होते
पाप सर्वांचे सारखेच कालचे, परि आज
कोणी जळत तर कुणी गर्जत, बरसत होते
अजूनही ती याद हुंदके आणत होती
ओटीपोटी अजून वादळ पसरत होते
अलगद पोटामध्ये मावले डझनभर वडे
काल काय कल्पना उद्या काय उमळत होते
कबूल कि गझल जोशींची सहजसुंदर, तरी
हझल म्हणताच मन माझेही बहकत होते
धमाल हझल! लई आवडली!
धमाल हझल! लई आवडली!
सहीच. भारीये.
सहीच. भारीये.
सुरुवात चांगली झालेय... नंतर
सुरुवात चांगली झालेय... नंतर 'कंट्रोल' गेला थोडा
छाने
छाने
(No subject)
फक्त दुसरा शेर आवडला! त्यातही
फक्त दुसरा शेर आवडला! त्यातही 'हदडत' ह शब्द समजला नाही. इतर सर्व शेर यथा यथाच आहेत.
शरद
झकास!
झकास!
धमाल !
धमाल !
(No subject)
(No subject)