Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 22:42
प्रवेशिका ७ : रंग घराचे
मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी
रंग घराचे दिसादिसाला बदलत होते
कुठेतरी गळती़च असावी.. समजत होते
काल अचानक फार बरसले मिळून सारे
आज ढगांचे पाय कुठेही भटकत होते
जागोजागी सजले होते तडे, पोपडे
लोभस नव्हते, शोभत नव्हते .. चिडवत होते
नकोच आता पुन्हा चुना तो उभा आडवा
वरवर बघता भिंतीचीही फसगत होते
मी काही ठरवून पापुद्रे खरडत नाही
जे होते ते माझ्याकडुनी नकळत होते
उपदेशाचा डोस चुकीचा असेल तर मग..
केल्या गेल्या खर्चाचीही.. करवत होते
अधेमधे ती भिंत तुकडे टाकत होती
तळी तिच्याच बसून तेही विनवत होते
ध्यानी आली मजला माझी रंगकला ती
रंगार्याला परि कुठे ते उमगत होते....
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)