कैरीची गोड चटणी.
Submitted by आरती on 26 July, 2013 - 16:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
कैरीची चटणी
साहित्य:
१ कैरी, अर्धी वाटी ओलं खोबरं, ३/४ मिरच्या, गूळ, १ चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, बारीक आल्याचा तुकडा, मिळून येण्यासाठी १ चमचा दाण्याचे कूट.
फ़ोडणीसाठी पाव च. तेल, मोहोरी, हिंग, २ चिमटी मेथ्या पावडर.
कृती: कैरीची सालं काढून तुकडे करा. या तुकड्यांच्या ऐवजाएवढाच गूळ घ्या. कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण ठरवा.
मिक्सरमधे कैरीचे तुकडे, गूळ, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, दाण्याचं कूट सर्व टाकून ग्राइंड करा.
अगदी पाव चमचा तेलाची मोहोरी, हिंग, मेथी पावडर घालून फ़ोडणी करून ती या चटणीवर ओता.
आणि कश्याहीबरोबर खा.
यात कैरी थोडी पाडाची असली तरी चालते.