Submitted by मानुषी on 24 May, 2012 - 06:36
कैरीची चटणी
साहित्य:
१ कैरी, अर्धी वाटी ओलं खोबरं, ३/४ मिरच्या, गूळ, १ चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, बारीक आल्याचा तुकडा, मिळून येण्यासाठी १ चमचा दाण्याचे कूट.
फ़ोडणीसाठी पाव च. तेल, मोहोरी, हिंग, २ चिमटी मेथ्या पावडर.
कृती: कैरीची सालं काढून तुकडे करा. या तुकड्यांच्या ऐवजाएवढाच गूळ घ्या. कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण ठरवा.
मिक्सरमधे कैरीचे तुकडे, गूळ, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, दाण्याचं कूट सर्व टाकून ग्राइंड करा.
अगदी पाव चमचा तेलाची मोहोरी, हिंग, मेथी पावडर घालून फ़ोडणी करून ती या चटणीवर ओता.
आणि कश्याहीबरोबर खा.
यात कैरी थोडी पाडाची असली तरी चालते.
कोथिंबिरीऐवजी भरपूर पुदिना वापरला तरी चालते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मला डिलिट करायचं आहे. कसं
हे मला डिलिट करायचं आहे. कसं करू?
अॅडमिनच्या विपूत लिंक देऊन
अॅडमिनच्या विपूत लिंक देऊन लिही.
मस्तंय. राहूदेत
मस्तंय. राहूदेत