कैरीची गोड चटणी.

Submitted by आरती on 26 July, 2013 - 16:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी कैरीचे चौकोनी तुकडे,
१ वाटी टोमॅटो बारीक चिरून,
१ वाटी साखर,
१ लाल सुकलेली मिरची,
१ चमचा पंचफ़ोडण,
१/४ चमचा लाल तिखट,
१/४ चमचा हळद,
२ चमचे तेल,
१०-१२ बेदाणे,
१ वाटी पाणी.

क्रमवार पाककृती: 

तेल तापवून घ्यावे, त्यात पंचफोडण, हळद, मिरची (२ तुकडे करून) घालावे. टोमॅटो घालावा. मग तिखट घालावे. [म्हणजे ते तेलात जळण्याची शक्यता रहात नाही] हे मिश्रण एकदा हलवून लगेचच कैरीच्या फोडी घालाव्या. बेदाणे, साखर आणि पाणी घालावे, एकदा हलवून मंद आचेवर शिजत ठेवावे. मिश्रण एकतारी पाकासारखे किंवा थोडे चकचकीत दिसायला लागले की गॅस बंद करावा. साधारण १५ मिनीटांत तयार होते.

Kairi Chatani.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ जणांना.
अधिक टिपा: 

१. ही जरी चटणी असली तरी ही नुसतीच खातात, म्हणुन कैरीच्या फोडी थोडया मोठ्याच घ्याव्या. [जेवण झाल्यावर पण डेसर्टच्या आधी असे हा पदार्थ खाल्ला जातो. बंगाली लोकं यात बरीच वेरीएशन्स करतात, मुख्य घटक मात्र कैरीच असतो.]
२. कैरीच्या आंबटपणावर साखर-पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होते.
३. आंबट-गोड म्हंटले तरी हा पदार्थ गोडाकडेच झुकणारा असतो.
४. मस्त लागते …. Happy

माहितीचा स्रोत: 
माझी कोलकात्याची शेजारीण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users