Submitted by मानुषी on 24 May, 2012 - 06:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
साहित्य:
१ कैरी, अर्धी वाटी ओलं खोबरं, ३/४ मिरच्या, गूळ, १ चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, बारीक आल्याचा तुकडा.
फ़ोडणीसाठी पाव च. तेल, मोहोरी, हिंग, २ चिमटी मेथ्या पावडर.
क्रमवार पाककृती:
कृती: कैरीची सालं काढून तुकडे करा. या तुकड्यांच्या ऐवजाएवढाच गूळ घ्या. कैरीच्या आंबटपणावर गुळाचे प्रमाण ठरवा.
मिक्सरमधे कैरीचे तुकडे, गूळ, जिरे, मीठ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं, दाण्याचं कूट सर्व टाकून ग्राइंड करा.
अगदी पाव चमचा तेलाची मोहोरी, हिंग, मेथी पावडर घालून फ़ोडणी करून ती या चटणीवर ओता.
आणि कश्याहीबरोबर खा.
यात कैरी थोडी पाडाची असली तरी चालते.
कोथिंबिरीऐवजी भरपूर पुदिना वापरला तरी चालते.
अधिक टिपा:
या दिवसात ही चटणी तोंडाला चव आणते.
माहितीचा स्रोत:
आई.
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
.... यम्मी
.... यम्मी
मस्त ! आंबटगोड..
मस्त ! आंबटगोड..
मस्त. मी करते नेहमी
मस्त.
मी करते नेहमी कैरीपुदिना चटणी.
मस्त!! उद्याच करुन बघणार.
मस्त!! उद्याच करुन बघणार.
मस्त!! ....फोटो..........
मस्त!! ....फोटो..........
सर्वांना धन्यवाद! श्रुती
सर्वांना धन्यवाद! श्रुती .....चटणीचा काय फोटो टाकायचा म्हणून काढलाच नाही.
मस्तच.
मस्तच.