कवितेवर केलेल्या चारोळ्या ....
कवितेत माझ्या मीच वसते
शब्दातून मी होते व्यक्त
कधी प्रेमाने बहरून जाते
कधी शब्दातून गळते रक्त …. १
माझ्या शब्दांचं चांदणं
तुझ्या डोळ्याचं आभाळ
आणि त्याचं प्रतिबिंब
एक कविता वेल्हाळ …. २
कवितेत सामावले
माझे अस्तित्वच आहे
आहे नावात कविता
मनातही तीच राहे …… ३
अनावर दु:ख जेव्हा
उचंबळे -हदयात
माय माउली कविता
घेते पदराच्या आत … ४
कवितेचा जन्म झाला
अशा लेखणीमधून
आसवांची जिची शाई
पहा झरते अजून …… ५
कविता क्षीरसागर
अर्जुन आणि आणि इतर शिष्यांमध्ये डावा-उजवा भेद करणारे द्रोणाचार्य एकलव्याला त्याचा उजवा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून मागतात तेव्हा ....
तुझ्या कृपेचा मी अभिलाषी
डावे उजवे तुझ्या मानसी
अर्पिन तुजला काम्य गुरुदक्षिणा
मम-वामतीर पण ठरेल उजवा रणा
उर्मिला - लक्ष्मणाची पत्नी. लक्ष्मणाला रामाचे नीट रक्षण करता यावे म्हणून ती अयोध्येत मागे थांबते आणि लक्ष्मणाच्या वाटची चौदा वर्षांची झोप स्वीकारते.
साह्ली अजब विरह वेदना
लक्ष्मणा रामाची वंचना
वसंत चौदा गेले शयना
उर्मिले सौभाग्य तू लक्ष्मणा
सूर्य आणि चंद्राने निखळ स्पर्धा न करता एकमेकांची अडवणूक केली तर अंधाराचा विजय होतो.
1- टपोरे डोळे तुझे
हे भुरभुरणारे केस,
आपल्या लग्नात मात्र
तू नऊवारी नेस.
--------------------------------------------------
2- आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुझ्यासाठी थांबलो,
पण तू तिथे कुठे भेटलीच नाही.
नाईलाजाने पुढे निघालो
तर तू आधीच पोहोचलेली.
-------------------------------------------------
3- तुझ्या नाजूक हसण्यात
एक साज आहे,
आणी ह्याच गोष्टीचा
मला माज आहे
-------------------------------------------------
खूप वर्षांपूर्वी काही चारोळ्या लिहिल्या होत्या .
काही माणसाच्या बाबतीत
आपले अंदाज किती चुकतात
सूर्याची कल्पना करावी
तर ते काजवेच निघतात
चालून चालून पाय थकले
कि मग थांबावस वाटत
भूतकाळाच्या पानावर
आठवणींच दव साठत
पैशांमागे धावताना
मी किती गमावलं
हाही एक प्रश्नच आहे
कि मी किती कमावलं
मी, माझे करता करता
सगळ आयुष्य सरलं
आपण आपले म्हणायला
आयुष्याच कुठे उरलं
१) कधीकाळचे दाटून येते
डोळा पाणी....
आठवणींची हळवी ओली
स्मरता गाणी....
२) माणूस नामक गर्दी मजला
वेढून राही....
एकाकीपण तरीही माझे
संपत नाही....
३) अवघडलेपण येते मजला
अशाच वेळी....
सांगायाचे जेंव्हा तुजला
सारे काही....
४) मला कळाले आज अताशा
कविते विषयी....
उत्स्फूर्ताचे गीत भिडतसे
नेहमी हृदयी....
- समीर पु.नाईक
१.
अनोळखी वाटेवर क्षणभर
भेटुन जाई राजकुमार -
नाही दिसला पुन्हा जरी तो
ओढ तयाची का अनिवार !
२.
मिठीत तुझिया विसावतो मी -
म्हणू लाडके कसे तुला ?
चवळीची तू शेंग बारकी ,
दुधी टम्म मी फुगलेला !
खांदा देण्या कितिदा गेलो
इतक्या वेळा मी गेलो -
आपल्यासाठी उरले कोणी
... पहावयाचे विसरून गेलो ! |१|
एक तारखेची गंमत असते
आमच्या प्रेमा भरती येते -
माझ्या नयनीं पत्नी असते
तिचिया नयनीं वेतन असते ! |२|
कचरामुक्त जगास बघावे
ध्यास मनीं जरि धरतो -
अशक्य मजला परि वाटते,
जोवर मी लेखन करतो ! |३|
सावलीतही गॉगल लावून
हीरो बनण्या गेलो ,
' डोळे नाहीत आले- '
सांगत घामाघूम झालो ! |४|
(पूर्व प्रसिद्धी: हास्यगाssरवा २०१२)
'पहाटे ओरड पाहिजे तेवढे-'
कोंबडी म्हणाली कोंबड्याला,
'ऐकावी लागणार दिवसभर
नंतर पक् पक् माझी तुला !'
मांजर निघाले घाईघाईत
शिकार उंदराची करायला -
आडवा आला माणूस नेमका
परतावे लागले मांजराला !
मुंगळयाने पाहिली गुळाची ढेप
निघाला तुरुतुरु खायला -
मधेच एक माशी शिंकली
माणसाच्या पायाखाली आला !
एक खेकडा सकाळी उठला
पूर्वेकडून पश्चिमेला निघाला -
संध्याकाळ होईपर्यंत
उत्तरेला नेमका पोहोचला !
दिवाळीला खास भेट,किल्ले करण्यासाठी माती,
शाळकरींना फुकट- तयार केली हंवी तशी,
योजना ही नेत्याची- उदार अन् मोलाची.
केलेत खळगे कुठेकुठे, त्यांनाच असणार माहिती !
जागा नसेल घरात तर अन्य कुठेही बांधा,
रस्त्यावर, पायरीवर-पाठिंबा माझा- नाही वांधा.
राजांची-देवांची मूर्ति सजवा, काळजी नको,
आम्ही हेच केलं,म्हणून निवडणूक जिंकलो.
अतिक्रमण नाही अर्थशून्य- मिळेल मोबदला,
सेवा नगराची - निवडून पुन्हा द्या माला !
"प्रेम"
मी डाफरता तू शांत रहावे
तू ओरडता मी गप्प बसावे-
मौनातच नजरांनी हसावे
बहुधा हेच ते 'प्रेम' असावे !
"बदला"
काल कावळा दारी 'काव'ला
तरी पाहुणा नाही टपकला !