संयुक्ता मुलाखत : मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट दीपाली देशपांडे
संयुक्तातर्फे दर महिन्याला एका यशस्वी, कर्तबगार स्त्रीची ओळख आपण करून घेत असतो. काही महिन्यांपूर्वी मनात आलं की मायबोलीवरही आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे जम बसवलेल्या अनेकजणी असतील, त्यांची मुलाखत वाचायला सर्वांनाच आवडेल. लगेच एक नाव डोळ्यांसमोर आलं ते दीपाली देशपांडे उर्फ मायबोलीवरची आपली ’दीपांजली’ हिचं. आपला छंद, कला व्यवसायात बदलण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं. दीपाली त्या भाग्यवंतापैकी एक! मायबोलीवर वेळोवेळी होणार्या गप्पांमधून दीपाली ’मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट’ आहे हे बर्याचजणांना माहीत असेल.