माझा व्यवसाय

संयुक्ता मुलाखत : मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट दीपाली देशपांडे

Submitted by अगो on 3 October, 2012 - 05:31

संयुक्तातर्फे दर महिन्याला एका यशस्वी, कर्तबगार स्त्रीची ओळख आपण करून घेत असतो. काही महिन्यांपूर्वी मनात आलं की मायबोलीवरही आपल्या व्यवसायात उत्तम प्रकारे जम बसवलेल्या अनेकजणी असतील, त्यांची मुलाखत वाचायला सर्वांनाच आवडेल. लगेच एक नाव डोळ्यांसमोर आलं ते दीपाली देशपांडे उर्फ मायबोलीवरची आपली ’दीपांजली’ हिचं. आपला छंद, कला व्यवसायात बदलण्याचं भाग्य खूप कमी जणांना लाभतं. दीपाली त्या भाग्यवंतापैकी एक! मायबोलीवर वेळोवेळी होणार्‍या गप्पांमधून दीपाली ’मेंदी आणि बॉडी पेंटिंग आर्टिस्ट’ आहे हे बर्‍याचजणांना माहीत असेल.

विषय: 

गुळ उत्पादन व विक्री व्यवसाय

Submitted by चंपक on 20 January, 2010 - 21:57

ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्‍हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच!

यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - माझा व्यवसाय