अमेरिका वेस्ट कोस्ट टुर्सची माहिती हवी आहे.
नमस्कार
मला अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट टूर्सची माहिती हवी आहे.
माझे आई-बाबा सध्या अमेरिकेत आले आहेत. त्यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये वेस्ट कोस्टची ग्रुप टूर करायची आहे. तुम्हाला जर कोणत्या टुरीस्ट कंपनी माहित असतील किंवा त्यांचा काही अनुभव असेल तर सांगू शकाल का?
खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे फक्त भारतीय टुरीस्ट कंपनीच चालतील असे मला वाटतंय. केसरीची टूर जुलैमध्ये असल्यामुळे तो ऑप्शन बाद झालाय.
धन्यवाद!!