कार्तिकातल्या पहाटे
म्हैस विते,
इनकॅन्डेसन्ट पिवळ्या उजेडात
कडब्यावर पडलेलं
ओलसर वासरू दिसतं, ते
अप्रूप डोळ्यात साठवतो मी दोन तीन क्षण
सैरभैर म्हशीच्या उष्ण उछ्वासानं भंगते ती तंद्री,
पाठीवर थंडीच्या चांदण्या शिरशिरतात.
अचानक आठवतात ते पाच दहा सेकंद
हातसन डेअरीच्या बॅलन्सशिटा चाळता चाळता
(बांधण जनप्रतिष्ठान आयोजित काल (४ मार्च) पुण्यात झालेल्या "गजलोत्सव २०१२" अंतर्गत मुशायर्यामध्ये सादर केलेली गझल. दोन मतले सुचले होते, दोन्ही इथे देतोय)
जुने नाते अजुनही रेशमी आहे
तरीही बघ तुला परकाच मी आहे!
जुने नाते अजुनही रेशमी आहे
अजुनही त्यात थोडासाच मी आहे!
तुझ्या पत्रातला मजकूर विश्वासू!
तुझे प्रत्येक अक्षर मोसमी आहे
अता "आम्ही" म्हणवतो मी स्वतःलाही
(तुझ्याबद्दल दिलेली ती हमी आहे!)
म्हणे तू प्रेमही केलेस माझ्यावर!
तुझ्या-माझ्यातली ही बातमी आहे
भटकतो पावसाचे थेंब शोधत मी
रुजायाची मुळी क्षमता कमी आहे!
कधी हलकेच भळभळतो स्वतःशी मी