विठाई मिठाई
विठाई विठाई अशी मिठाई
साख-याला गोडी तूझीच गं आई
या मिठाईचा असे श्रीहरी हलवाई
देई भरभरुनी हरेका हवी ती गोडाई
फुकटची लूट धन मागत नाही
गोकुळीचा चोर बालवयाचा ज्ञानाई
हरी नावाचा ब्रॅंड न मिळे बाजारात
लागे सहजची हाती, डोकावता अंतरात
चाखा अविरत, अखंड मिठाई नामाची
खा कितीही गोड नाही भिती मधूमेहाची
खावी कुठेही, कशीही भूक भागत नाही
मन तृप्त तृप्त दुजे काही लागत नाही
© दत्तात्रय साळुंके
10-07-2020
शॉगतम
तुमी की खॉबे??? मिश्ती किचु??? ....
बंगाली मिठाई .. बंगाली भाषेसारखीच गोड आणि परत परत खावीशी वाटणारी... रोशोगुला, चॉमचॉम.. अशे बोबडे उच्चार करायलाही किती मजा वाटते ना?
तर मग सांगा बर तुमच्या आवडत्या बंगाली मिठाया, त्यांचा इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र.. त्या बनवण्याच्या पाककृती (पाकृ योग्य जागी लिहीणे आणि इथे फक्त लिंका देणे), आणि युक्त्या, अस्सल बंगाली मिठाई कुठे चांगली मिळते.. हलवाई/हॉटेल इ इ ....सोबकिचु बाँगला मिश्ती
ज्यांना बंगाली मिठाई आवडत नाही त्यांना या धाग्यावरच्या पोष्टीवाचुन त्या आवडायला लागणार याची खात्री
शुरु कोरो...
चालो खाई
युगलगीत: बासूंदी गोड गोड
तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||
ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||
तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१||
ती:
माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई
मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई
बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड