बंगाली मिठाई फॅन क्लब

Submitted by लाजो on 28 June, 2012 - 21:36

शॉगतम Happy

तुमी की खॉबे??? मिश्ती किचु??? .... Happy

बंगाली मिठाई .. बंगाली भाषेसारखीच गोड आणि परत परत खावीशी वाटणारी... रोशोगुला, चॉमचॉम.. अशे बोबडे उच्चार करायलाही किती मजा वाटते ना?

तर मग सांगा बर तुमच्या आवडत्या बंगाली मिठाया, त्यांचा इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र.. त्या बनवण्याच्या पाककृती (पाकृ योग्य जागी लिहीणे आणि इथे फक्त लिंका देणे), आणि युक्त्या, अस्सल बंगाली मिठाई कुठे चांगली मिळते.. हलवाई/हॉटेल इ इ ....सोबकिचु बाँगला मिश्ती Happy

ज्यांना बंगाली मिठाई आवडत नाही त्यांना या धाग्यावरच्या पोष्टीवाचुन त्या आवडायला लागणार याची खात्री Happy

शुरु कोरो...

चालो खाई Happy

523.jpg

(प्रचि आंतरजालावरुन साभार Happy )

तटिप्स:

१. हा धागा नुस्ता वाचुन कुणाचे वजन वाढल्यास धागानिर्माती जबाबदार नाही.
२. हा धागा वाचुन, कुणी बंगाली मिठाई खल्ल्यास आणि त्यांचे वजन वाढल्यास धागानिर्माती जबाबदार नाही.
३. हा धागा वाचताना, लाळ गळल्यास आणि ती कीबोर्डवर पडुन तो खराब झाल्यास धागानिर्माती जबाबदार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाई सँडविच
(गळणारी लाळ पुसायला रुमाल आणायला जात असल्याने पुढली नावे लिहिता येत नाहीत).

लाजो, माझा लेक नेमका हे पान बघताना आला जवळ, आता झक्कत जाऊन आणावी लागणार ना मला :रागः बंगाली मिठाई म्हणजे जीव का प्राण त्याचा. झोपेतून उठूनही खाईल Proud मलाही आवडते पण वजन Sad
भरत, मलई सॅडविच... रामा नुसत्या नावनेही ४ किलो वजन वाढले ना माझे Wink
नुसत्या तटिपा देऊन चालणार नाही. योग्य ती जबाबदारी धागा निर्मातीला घ्यावीच लागेल Proud

लाजो Lol

तळटीपा वैधानिक इशारे म्हणून सुरुवातीलाच ठळक अक्षरांत द्यायल्या हव्यात.

मलाई सँडविच चर्चगेटच्या एशियाटिकमधून. ऑफिसमध्ये सेलिब्रेशन असले की मस्ट असे.

अरे व्व्वा....!!
माझा फेव्हरेट.... रसगुल्ल्ला... एकदम भीषण फेव्हरेट Wink

अग काय हे, गेल्या आठवड्यापासूनच व्यायामाला सुरवात केली आहे. Sad
ह्याबरोबर तळटिपेत व्यायामाच्या लिंका दे आता.

व्वॉव!!! मी पण सभासद या क्लबची.. परवाच झामामधलं मलई सँडविच खाल्लेले. चव अजून जीभेवर आहे Happy

>एकदम भीषण फेव्हरेट>> Lol हो हो अगदी भीषण भीषण.. भीषण भालो वगैरे Happy
>>बंगाली मिठाई मुंबईत कुठे चांगली मिळते याची लिस्ट देइनच.>> तोषांनो द्याच मग Happy

लाजो,मी मत्स्याहारी.मिठाईचा मोह कमीच..माशेर झोलची आठवण मात्र झाली.फोटो घायाळांना अधिक घायल करणारे :)) छानच.

पवईत हिरानंदानीच्या गॅलेरीआमध्ये स्चीट बेंगाल म्हणून दुकान आहे - त्याच्याकडे मिष्टी दोई आणि खीर कॉदोम अप्रतिम मिळतात. जरा महाग आहे पण चव मस्तच असते.

बाकीच्या मिठाया खाऊनच नाही बघितल्या तिथे - व्यायामाच्या आळसापायी Happy

अरे व्वा!, बोरेच बाँग्ला मिश्ती फॅन्स अहेत की Happy

इथे आधी कुणी बंगाली मिठाई... किंवा त्याचे अडॉप्टेड व्हर्जन च्या पाकृ टाकल्या असतिल तर इथे लिंका टाकाल का प्लिज.

संदेश भारी प्रिय! स्वीट बेंगॉलमधले पांढरे, शंखांच्या आकाराचे शोंदेश फारच मस्त असतात. आणि कालाजामून. अहाहा!!!!

शोंदेश : http://www.ahomemakersdiary.com/2011_01_01_archive.html

माझ्या मनात के सी दास आणि बाँगला मिठाई यांचे अतूट नाते आहे. बंगलोरला जयनगरच्या के सी दासवर घिरट्या घालणे हा आवडता छंद होता! तरी उत्तम प्रतीचा रोशोगोल्ला जगाच्या पाठीवर कोठेही / कोणीही बनवलेला चॉलेल. अहमदाबादेला एका महाशिवरात्रीला 'रोशोगोल्ला उपवास' केलेला (म्हणजे दिवसभर फक्त रोशोगोल्ले खाऊन उपवास!!!) तो अद्याप स्मरणात आहे! Proud

हे बंगाली लोक ना, खिशात लिंबं ठेवतात, जरा कुठे दूध दिसल की लगेच पिळतात दूध फाडायला... :प
(फक्त मजा म्हणून लिहिलयं, गैरसमज, राग नसावा...)

बाकी धागा मस्तच. मी मात्र मोठ्ठा पंखा आहे रसमलईचा!

लाजो, तळटीपा लईच भारी Lol

मला रसमलाई आणि अंगुरमलाई खूप्पच आवडतात.
रसगुल्ला अज्जिबात आवडत नाही.

योगेश बंगाली लोक दूध दिसलं की फाडायला जातात हे खरं. पण लिंबाने नाही. आधी फाडलेल्या दुधाच्या राहिलेल्या पाण्यानेच फाडतात.

मी पण आजीवन सदस्य ह्या फॅनक्लबची. मिष्टी दोई ( बँगलोरच्या केसी दासमध्ये मातीच्या मटक्यात अफलातून मिळायचे. ) आणि अनारकली स्टाईल ( रसगुल्ला आणि त्यावर मलाई असं बेसिक काँबिनेशन असलेली कुठल्याही रंगातली, नावाची मिठाई. ) मिठाया भयंकर आवडतात. अहाहा ! Happy

Pages