बंगाली मिठाई फॅन क्लब

Submitted by लाजो on 28 June, 2012 - 21:36

शॉगतम Happy

तुमी की खॉबे??? मिश्ती किचु??? .... Happy

बंगाली मिठाई .. बंगाली भाषेसारखीच गोड आणि परत परत खावीशी वाटणारी... रोशोगुला, चॉमचॉम.. अशे बोबडे उच्चार करायलाही किती मजा वाटते ना?

तर मग सांगा बर तुमच्या आवडत्या बंगाली मिठाया, त्यांचा इतिहास, भूगोल, भौतिकशास्त्र.. त्या बनवण्याच्या पाककृती (पाकृ योग्य जागी लिहीणे आणि इथे फक्त लिंका देणे), आणि युक्त्या, अस्सल बंगाली मिठाई कुठे चांगली मिळते.. हलवाई/हॉटेल इ इ ....सोबकिचु बाँगला मिश्ती Happy

ज्यांना बंगाली मिठाई आवडत नाही त्यांना या धाग्यावरच्या पोष्टीवाचुन त्या आवडायला लागणार याची खात्री Happy

शुरु कोरो...

चालो खाई Happy

523.jpg

(प्रचि आंतरजालावरुन साभार Happy )

तटिप्स:

१. हा धागा नुस्ता वाचुन कुणाचे वजन वाढल्यास धागानिर्माती जबाबदार नाही.
२. हा धागा वाचुन, कुणी बंगाली मिठाई खल्ल्यास आणि त्यांचे वजन वाढल्यास धागानिर्माती जबाबदार नाही.
३. हा धागा वाचताना, लाळ गळल्यास आणि ती कीबोर्डवर पडुन तो खराब झाल्यास धागानिर्माती जबाबदार नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी फाडलेल्या दुधाच्या राहिलेल्या पाण्यानेच फाडतात.>> नाही हो मयेकर. लिंबाच्या रसाने किंवा सायट्रिक अ‍ॅसिडने फाडतात. मिठायांच्या दुकानात मोठ्या प्रमाणात करतात म्हणून रसायनं वापरतात.

बंगाली मिठाईत दोन महत्वाचे फरक
१. नरमपाक (नेहेमीचा) संदेश, चमचम इ. प्रकार. ते लगेचच शक्यतो त्या दिवशीच संपवलेले चांगले.
२. कडा-पाक संदेश. तो ७-८ दिवस टिकतो.

http://petpujoh.blogspot.in/2007/10/sweet-tooth.html या दुव्यावर बंगाली मिठायांचे बरेच प्रकार दिलेले दिसतात (उदा: संदेशचे विविध प्रकार, शॉरभाजा, लँगचा, छानार जिलेपी, पाटीशॉप्ता, राबडी, मोरब्बा, खीरकदंब, इ.)

मला स्वतःला मिठाई अजिबातच आवडत नसल्याने त्यात चांगलं-वाईट अशी प्रतवारी मी करू शकत नाही

हमारेमे इतना दूध नही फाडते... वो बंगल्योंका क्या है.. लिया दूध के फाडा दूध... लिया दूध के फाडा दूध...
इति एकतर सासूबाई किंवा त्यांची सौदिंडियन शेजारिण.

मी दुधाचे... निरसं दूध ते बंगाली मिठाई ह्या प्रवासातलं काहीही (तुपाची बेरी सुद्धा) अत्यंत प्रेमाने खाते.
त्यातही... बंगाली मिठायांमधे मिष्टी दोही, उत्तम अ-चिवट रोशोगुल्ला इ. आत्यंतिक आवडीचे.
नानकची रसमलायी सुरेख आहे ह्याबद्दल वाद नाही.

मी पण बंगाली स्वीट ची फॅन..
गोरेगाव ई. ला स्वीट बेंगाल म्हणुन आहे , तिथे मिळतं सगळं

खीर कॉदोम , साँदेश, मलई सँडविच, विशेष आवडते..
नवरा खीर कॉदोम वर फिदा.. Happy

पवईत हिरानंदानीच्या गॅलेरीआमध्ये स्चीट बेंगाल म्हणून दुकान आहे - त्याच्याकडे मिष्टी दोई आणि खीर कॉदोम अप्रतिम मिळतात. जरा महाग आहे पण चव मस्तच असते.>>>>>>>>>>>>>>>>> खीर कोदोम मला पण खूप्प खूप्प आवडतं......चेंबुर मधे पण आहे...तिथे आईस्क्रीम साँदेश पण मस्त लागतात.....खीर कोदोम चे पण दोन प्रकार आहेत...एक गुरेर कोदोम ( गुळ घातलेले ) आणि साखर घातलेले..दोन्ही बेस्ट....मी तर चार कोदोम एका वेळी गट्टं करु शकते.... मलाई सँन्ड्विच इतके नाही आवडत पण बाकी सर्व खुप खाउ शकते...........

Pages