' तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - '
--विचारून माझ्या प्रेमाचा
का अपमान करतोस रे.....
वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर
तू सावरलेल्या माझ्या
चेहऱ्यावरच्या अवखळ बटा...
सागरतीरी मी वाळूत
ओढलेल्या रेघोट्यावर
तुझे अलगद फिरलेले बोट...
ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे
तू आपल्या ओठांनी टिपून
घेतलेला पावसाचा एकेक थेंब...
क्याफेतल्या उष्टावलेल्या
कॉफीच्या मग धरलेल्या
माझ्या हातावर तो हळूच
फिरलेला तुझा हात ...
डोळ्यात डोळे घालून
अगणित काळापर्यंत
पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ...
माझ्या हृदयाच्या कप्प्यातल्या
एका कोपऱ्यात मी दडवलेल्या
त्या सगळ्या आठवणी ...
" फुलू दया ना मला जरा ,
बघू दया ना जग जरा -
तुम्ही सजीव, मीही सजीव
कळून घ्या भावना जरा -"
एक कळी स्फुंदत होती ,
वेलीजवळ मी असताना -
मन आपले उलगडत होती
हितगुज माझ्याशी करताना !
" काही करू शकत नाही
जगाविरुद्ध जाता येत नाही -
मरणाऱ्याला जगवते जग
जगणाऱ्याला मारते जग -"
...केविलवाणे होत म्हणालो ,
दु:ख जाणूनही कळीचे .
खिन्न हसून ती वदली ..
" नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! "
.
किती जणांचा धावा केला
कुणी न तेव्हां धावत आला
किती दमले मी टाहो फोडुन
रडले कुढत अपुल्याच मनातुन
जपण्याचा मी प्रयत्न केला
शीलाच्या माझ्या ठेव्याला
दुर्दैवाचा घाला पडला
नशिबी दुर्योधन धडपडला
जगास फुटला नाही पान्हा
धावत नाही आला कान्हा
सुन्न-खिन्न टाकून मी मान
पुरुषार्थाचा बघत अपमान !
. . .
तुला भेटल्यावर मी
एकही शब्द बोललो नाही !
अगदी स्वाभाविक आहे
तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;
सांगू का खरेच सखे ,
तुला पाहताक्षणीच -
नुसतेच पहावेसे
वाटत राहिले...
शब्दांनाही !
.
बहरलेला वृक्ष होतो ,
एकदा मी छानसा -
गळुन गेली फूल पाने..
एकटा मी हा असा !
नाचती पक्षी कसे
बघुनिया खांद्यावरी..
खेळताना, होइ मजला
हर्ष माझ्या अंतरी -
रात पा-याची, वा-याचा दंगा
गंध श्वासाशी घालतो पिंगा
कडेशेवट राधा-हृदय हे
वाट पाहते ये ना श्रीरंगा
नीज लोचनी दाटली छद्मी
आत मोहन-भेटीची उर्मी
कुठे उरले आता माझी मी
वाट पाहते ये ना श्रीरंगा
राधा-मन हे सारखे गावे
शाममय हे तनही व्हावे
शाम-चांदणे एकदा प्यावे
वाट पाहते ये ना श्रीरंगा
इथे न यमुना इथे न गोकुळ
गोपसुतांची इथे न वर्दळ
कसा राहिला भरून अजुनही
वैजयंती ग, तुझाच दरवळ?
कृष्ण कुठे का आता उरला ?
कुणीच नाही त्यास पाहिला
सांग सानिके सूर तुझे हे
आजही असती निर्मळ मंजुळ?
वैजयंती वा असो सानिका
जगा भुलविते तुझी राधिका
युगे लोटली अजुन तरीही
चराचरातुन कृष्णच केवळ
त्याच्या व्यापातून बाहेर पडतोचना
तो येते ती शुकशुक करीत
तो ठरतो हताश तर ती वाटते छचोर
त्याच्या पोटात जाळ तर तिच्या गात्राला अत्तर
तो एक चिंधूक तर ती नरम अस्तर
अंगातून निथळावा घाम तशी त्याची आग
डोळे जळवणारी
पंक्चरझाली सायकल अनवाणी रेटणारी
देहाला यावीत फुले तसा तिचा सहवास
वासना चाळवणारा
काळ्याभोर केसांचा वास गुरफटणारा
वेदनेतून उगवते वेदना तशी
मिळकतीच्या विवंचनेत हरवावा शेवटचा रुपया
मरेपर्यंत, जीव तुटेपर्यंत
मिळण्याच्या शेवटच्या आशेपर्यंत
धुंडाळत रहावे कचकचाटात
इच्छेच्या टोकाला इच्छा तशी
नजरेच्या स्पर्शागणिक मांसल देहात पडावी भर
थकेपर्यंत, पापणी मिटेपर्यंत
अंगभर ल्या वस्त्र अन् झाका म्हणे ही नग्नता,
मी कशी समजून घेऊ ही अडाणी सभ्यता?
पाट ओल्या वासनांचे वाहती चहुबाजूनी
काय मी माझी जपावी कोरडी सौजन्यता?
जन्म का झाला तीचा येथून रण होते सुरू
साकडे देवीचपाशी घालते निर्लज्जता!
वाघ आम्ही पाळलेले चार भिंतींतून हे
तेच ते सैतान झाले उंबरा ओलांडता!
तीव्रता माझ्या मनाची व्यक्त करता येईना
कधीही उल्कापात व्हावी अक्षरांतील सौम्यता.
मी कुठे लपवून ठेवू गं तुला माझ्या पिला
पंख माझे तोकडे अन् भाबडी वात्सल्यता...
सुसंस्कृतांनो या इथे घेऊन चिंध्या फाटक्या
आज झाकायाची आहे संस्कृतीची भग्नता!
या इथे रोवून टाका दगड मैलाचा कुणी...
...
कुठे धागा मिळेल का शोधतोय
मग चालत राहता येईल निवांत
रस्ता मिळेल त्याप्रमाणे
...
कुठून चाललोय कुठे?
कोण कुणाला घडवतेय प्रवास?
शरीर तर शरीर, ही इंद्रियंही ठरवत नाहीत ना आपली दिशा
...
असंख्य चिलटं झालीत
फार वेळ झालीय
ह्या दिव्याखाली थांबायला नको आता
...