अव्याहत

Submitted by समीर चव्हाण on 17 January, 2013 - 05:56

त्याच्या व्यापातून बाहेर पडतोचना
तो येते ती शुकशुक करीत

तो ठरतो हताश तर ती वाटते छचोर
त्याच्या पोटात जाळ तर तिच्या गात्राला अत्तर
तो एक चिंधूक तर ती नरम अस्तर

अंगातून निथळावा घाम तशी त्याची आग
डोळे जळवणारी
पंक्चरझाली सायकल अनवाणी रेटणारी

देहाला यावीत फुले तसा तिचा सहवास
वासना चाळवणारा
काळ्याभोर केसांचा वास गुरफटणारा

वेदनेतून उगवते वेदना तशी
मिळकतीच्या विवंचनेत हरवावा शेवटचा रुपया
मरेपर्यंत, जीव तुटेपर्यंत
मिळण्याच्या शेवटच्या आशेपर्यंत
धुंडाळत रहावे कचकचाटात

इच्छेच्या टोकाला इच्छा तशी
नजरेच्या स्पर्शागणिक मांसल देहात पडावी भर
थकेपर्यंत, पापणी मिटेपर्यंत
वीर्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत
बुडून रहावे समागमात

टाळता येत नाहीत त्याच्या चिंता
तर फिरूनफिरून बोलावतात तिची प्रलोभनं
ह्या जीवनचक्रात मी घुसळतोय अव्याहत

समीर चव्हाण

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली , या ओळी विशेष :

इच्छेच्या टोकाला इच्छा तशी
नजरेच्या स्पर्शागणिक मांसल देहात पडावी भर
थकेपर्यंत, पापणी मिटेपर्यंत
वीर्याच्या शेवटच्या थेंबापर्यंत
बुडून रहावे समागमात

टाळता येत नाहीत त्याच्या चिंता
तर फिरूनफिरून बोलावतात तिची प्रलोभनं
ह्या जीवनचक्रात मी घुसळतोय अव्याहत