मैत्री हे नात असत
मना मध्ये रुजलेलं
मैत्री हे गाण असत
हृदयात फुललेलं
मैत्रीचे रोप असतं
आपणच लावलेलं
स्नेह प्रेम विश्वासाचे
जल सिंपन केलेलं
सुखदु:खामध्ये साऱ्या
तो साथीदार असतो
पाठीवर थाप कधी
खांद्या आधार असतो
ईवल्याशा रोपाचा त्या
मोठा वटवृक्ष होतो
न मागता देतो घेतो
तिथे हिशोब नसतो
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
ठोकत ठोकत टाळ
ते उड्या मारत होते
तारस्वरी तोंडपाठ
देवगाणी गात होते
शुभ्र टोप्या डोक्यावरी
शुभ्र स्वच्छ लेंगे शर्ट
गाली भाळी लाविलेले
शुभ्र स्पष्ट नाम बोट
असा देव भेटेल का
प्रश्न माझा शिकलेला
पुन्हा पुन्हा येत मनी
तोच करी जुना ताळा
पण बेभान गातांना
त्यांना पूर्ण खात्री होती
ठामपणे संकीर्तनी
उंच उंच उडी होती
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
कीर्तन ही कला आद्य पुराण-काळापासून प्रचलित आहे. नारदास आद्य कीर्तनकार मानतात . नामदेव-तुकाराम-एकनाथ -रामदास आणि तत्सम साधूसंतांनी मुघल आक्रमणाच्या काळात हिंदू धर्माला आलेली ग्लानि आणि औदासिन्य/ धोका पाहता कीर्तन /भजन /भारुड /अभंग इत्यादि माध्यमातून लोकजागृती करून धर्मरक्षण केले . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य-निर्मिती च्या मागे संतांनी केलेली लोकजागरुती आणि सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी आहे.
सी.एस.टी वरून पनवेलला येणाऱ्या शेवटच्या लोकलने प्रवास करत होतो. मुंबईतल्या 'वारा खेळता असणाऱ्या' अश्या एकाच ठिकाणी - म्हणजे ट्रेनच्या दरवाज्यात उभा होतो!