कार्यक्रम - नाव नोंदणी
कार्यक्रम (event) हा लेखनप्रकार आता सर्व ग्रूपमध्ये उपलब्ध केला आहे. तसेच त्यात नाव नोंदणीची नवीन सुविधा देण्यात आली आहे.
जर तुम्ही त्या कार्यक्रमात सहभागी होणार असाल तर त्या धाग्यावर नाव नोंदणीमध्ये आपले नाव नोंदवा. तुमचे मायबोली सदस्य नाव तिथे आपोआप दिसेल. तुमच्या व्यतिरिक्त इतर व्यक्ती (मायबोलीकर नसलेले) येणार असल्यास तिथे लिहू शकता. फोन नंबर ऐच्छीक आहे.
तुम्ही नाव नोंदणी केल्यावर तुम्हाला एक इमेल येईल तसेच कार्यक्रमाच्या एक दिवस आधी आठवणीसाठी एक इमेल मिळेल.

