बाळकृष्ण ज्ञान केंद्र

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बाळकृष्ण ज्ञान केंद्र

बरेच दिवसापासुन मनात होते. व्यक्तीगत पातळीवर अनेकांना माहीती, मदत, सल्ला देणे ह्या कामाला संस्थात्मक अन व्यापक रुप देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बघु कितपत यश येतेय.....!
सध्या नेवासा तालुक्यातील १०० पेक्षा जास्त युवकांशी नियमित संपर्कात आहे. जुन २०११ पर्यंत (मी भारतात परत जाईपर्यंत) ते प्रमाण किमाण १००० वर नेणे हे प्राथमिक उद्दिष्ठ आहे.

' बाळकृष्ण ज्ञान केंद्र' (बाळकृष्ण नॉलेज सेंटर, करडकवाडी) ह्या उपक्रमाचे ऑर्कुट वरील प्रोफाईल ...

नेवासा तालुक्यातील (नेवासा तालुका हे एक प्राथमिक युनिट मानुन)
१)ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये मदत करणे.
२) शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी पडणारी क्षेत्रे लक्षात घेउन त्या उणीवा दुर करण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना सहकार्य करणे.
३) रोजगाराच्या अन स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती देणे.
४) उच्च शिक्षणासंबंधी संधींची माहिती देणे.
५) शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी, क्रिडा, आरोग्य, सामाजिक अन राजकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे.
६) नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान त्यांचे पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे.
७) प्रगत राष्ट्रांमधील नागरिकांच्या राहणीमानाच्या दर्जाप्रमाणेच, ग्रामीण भारतातील नागरिकाचे जगणे सुसह्य व्हावे ह्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करणे.

************

सध्याची स्थिती:

मला मिळालेली माहिती मी फोन वा मेल च्या रुपाने मित्रांपर्यंत पोहचवत होतो. मेल वर फार कमी लोक उपलब्ध आहेत. त्यामुळे फोन हाच एक मोठा संपर्काचा दुवा आहे. इथुन प्रत्येकाला प्रत्येक्वेळी फोन करणे खर्चिक नाही पण वेळ खाउ आहे. अन त्यात कधी कधी एखाद्याला फोन करणे राहुन जाते.

एक मित्र तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असल्याने ते त्यांच्या काही जवळच्या मित्र- नातेवाईकांकडे माहिती पोहच करत. माझ्या दाजींचे एक संगणक प्रशिक्षण केंद्र नेवासा इथे आहे. त्यांचे विद्यार्थी (अन तिथुन त्यांचेच संगणक प्रशिक्षण केंद्र चालवणारे मित्र यांचे विद्यार्थी) यामार्फत थेट विद्यार्थ्यांपर्यंत (संख्या @ ३००) माहिती पोहचत होती.

त्यामुळे सध्याचा खर्च हा फक्त मी त्यांना केलेले फोन वा पाठवलेल्या इ-मेल च्या प्रिंट्स काढुन वाटणे इतकाच होता. प्रिंटचा खर्च दाजी अन त्यांचे मित्रच करतात.

पुढील वाटचाल-

१) नेवासा इथे कार्यालय सुरु करणे. एक पुर्ण वेळ कार्यकर्ता (मानधनासह) कार्यालयात माहितीच्या देवाण घेवाणी साठी उपलब्ध करणे. (सध्या दाजींचे 'श्री रामकृष्ण संगणक प्रशिक्षण केंद्र, नेवासा' हेच कार्यालय)
२) त्यांच्या माध्यमातुन तालुकाभर पसरलेले संगणक प्रशिक्षण केंद्रांचे विद्यार्थी यांना माहिती पुरवणे.
३) माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍या मार्फत तालुक्यातील २०० शाळांपर्यंत माहिती पोहचवणे.
४) तालुका वकिल संघाच्या माध्यमातुन तालुक्यातील खेडी अन गरजु विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत संपर्क करणे. (माझे चुलते तालुका वकिल संघाचे अध्यक्ष होते, सध्या मोठे बंधु पदाधिकारी आहेत.)
५) माझ्या डेअरीप्रमाणे आता तालुक्यात १३ नवीन डेअरी सुरु झाल्या आहेत. तेथुन अंदाजे २००० शेतकरी कुटुंबापर्यंत संपर्क करणे.

६) या ज्ञान केंद्राचे पुढे चालुन माहिती सुविधा केंद्रात रुपांतर होइल व तिथे संस्थेचा खर्च भागवण्यासाठी काही व्यावसायीक कामे केली जातील, (उदा. ग्रंथालय, पुस्तके अन शालेय साहित्य विक्री, शेतीची- नवीन उपकरणे, सोलर वा पर्यायी उर्जा उपकरणे, ई)

*** सध्याच्या सेट अप मध्ये यासाठी ५,००० रु. प्रति महिना खर्च येईल. तो मी स्वतः करणार आहे. त्यापुढे, संस्थेचे माहिती सुविधा केंद्र सुरु झाल्यावर खर्च त्यातुनच भागवला जाईल. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर हे केंद्र चालवले जाईल.

*****************************************************

सर्व शाळांना अन शेतकरी कुटुंबाना संपर्क करण्याचा उद्देशच हा आहे, कि त्यातुन काही विद्यार्थी, तरुण असे मिळतील कि ज्यांना थोडे 'बुस्ट' केले कि ते त्यांचे उद्दिष्ट सहज गाठु शकतील. हा उपक्रम राबवताना असे कस्तुरीमृग शोधणे हा प्रयत्न निश्चितच राहिल. शहरात शिकणार्‍यांना कल्पना येउ शकणार नाही, पण पुणे-मुंबई इथे राहिलेला-शिकलेला शाळकरी मुलगा अन गावात राहिलेला शाळकरी मुलगा ह्याच्या माहिती मध्ये जमीन अस्मानचे अंतर असते. मी तरी ते किमान २५ वर्षे आहे असे मानतो...

एक साधे उदा. एम एस्सी ला प्रवेश घ्यायला पुण्यात केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या फेरीसाठी आलो असताना आम्हा मित्रांना कळले कि पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात एम एस्सी करायला वेगळी प्रवेश परिक्षा द्यावी लागले, फक्त बी एस सी चे मार्क तिथे मोजले जात नाहीत (दोन्ही ला ५०-५० वेटेज देउन गुणवत्ता यादी तयार करतात). अन आमच्यातील दोन हुषार मुलांना शेवटी जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. गुणवत्ता असुनही त्यांना तिथे संधी मिळु शकली नाही, कारण अशी काही प्रवेश परिक्षा असते हेच आम्हाला माहिती नव्हते! मग पुणे विद्यापीठ विभागप्रमुख अन आमचे प्राचार्य ह्यांना कल्पना दिली अन पुढील वर्षापासुन प्रत्येक महाविद्यालयाला प्रवेश परिक्षेची माहिती पाठवली जाउ लागली.

*************

पुढे चालुन ह्या माहिती सुविधा केंद्राला शासकीय सामाजीक कार्यक्रमांची 'नोडल एजन्सी' म्हणुन मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तो दुरचा टप्पा आहे. सध्या संस्था नोंदणी करायला अर्ज केला आहे (नोव्हेंबर २००९). पहिली फेरी झाली आहे (जनेवारी २०१०), पुढील फेरीनंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.(मार्च-एप्रिल २०१०)

*************

दोन मायबोलीकर, फ आणि कुल ह्यांनी ह्या उपक्रमाला सक्रिय सहकार्य देउ केले आहे. धन्यवाद!

फ माहितीपत्रकांमधील मजकुरांसंबंधी अन संपादनांसंबंधातील मदत करणार आहे. तर कुल आमच्याच तालुक्यातील असल्याने प्रत्यक्ष फिल्ड वर मदत करेल.

(सुरुवात... :))

*** मायबोलीकरांच्या सुचनांचे स्वागत आहे!

प्रकार: 

चंपक, अभिनंदन.
जमेल तसे, जमेल तेंव्हा अधीक माहिती पुरवत रहा जेणेकरुन इतरांना इतर ठिकाणी असे काही सुरु करायचे असल्यास मदत होईल. नेटवर्कींग (जाहीरात तसेच मदतीला इतर लोक मिळवणे) कसे केले, किती वेळ व पैसा लागतो आहे.

उत्तम उपक्रम, अभिनंदन.
याविषयी अधिक वाचायला आवडेल.

अभिनंदन चंपक.
हे तू एकट्याने सुरू केलेस की काही समविचारी लोक एकत्र आले आणि त्यांनी असे मार्गदर्शन केंद्र सुरू केले, आत्ता तू भारताबाहेर असतांना हे काम कसे चालवले जाते?

धन्यवाद!

@आशिष, रुनी :
सध्याची स्थिती:
मला मिळालेली माहिती मी फोन वा मेल च्या रुपाने मित्रांपर्यंत पोहचवत होतो. मेल वर फार कमी लोक उपलब्ध आहेत. त्यामुळे फोन हाच एक मोठा संपर्काचा दुवा आहे. इथुन प्रत्येकाला प्रत्येक्वेळी फोन करणे खर्चिक नाही पण वेळ खाउ आहे. अन त्यात कधी कधी एखाद्याला फोन करणे राहुन जाते.

एक मित्र तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असल्याने ते त्यांच्या काही जवळच्या मित्र- नातेवाईकांकडे माहिती पोहच करत. माझ्या दाजींचे एक संगणक प्रशिक्षण केंद्र नेवासा इथे आहे. त्यांचे विद्यार्थी (अन तिथुन त्यांचेच संगणक प्रशिक्षण केंद्र चालवणारे मित्र यांचे विद्यार्थी) यामार्फत थेट विद्यार्थ्यांपर्यंत (संख्या @ ३००) माहिती पोहचत होती.

त्यामुळे सध्याचा खर्च हा फक्त मी त्यांना केलेले फोन वा पाठवलेल्या इ-मेल च्या प्रिंट्स काढुन वाटणे इतकाच होता. प्रिंट चा खर्च दाजी अन त्यांचे मित्रच करत.

पुढील वाटचाल-

१) नेवासा इथे कार्यालय सुरु करणे. एक पुर्ण वेळ कार्यकर्ता (मानधनासह) कार्यालयात माहितीच्या देवाण घेवाणी साठी उपलब्ध करणे. (सध्या दाजींचे 'श्री रामकृष्ण संगणक प्रशिक्षण केंद्र, नेवासा' हेच कार्यालय)
२) त्यांच्या माध्यमातुन तालुकाभर पसरलेले संगणक प्रशिक्षण केंद्रांचे विद्यार्थी यांना माहिती पुरवणे.
३) माध्यमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍या मार्फत तालुक्यातील २०० शाळांपर्यंत माहिती पोहचवणे.
४) तालुका वकिल संघाच्या माध्यमातुन तालुक्यातील खेडी अन गरजु विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत संपर्क करणे. (माझे चुलते तालुका वकिल संघाचे अध्यक्ष होते, सध्या मोठे बंधु पदाधिकारी आहेत.)
५) माझ्या डेअरीप्रमाणे आता तालुक्यात १३ नवीन डेअरी सुरु झाल्या आहेत. तेथुन अंदाजे २००० शेतकरी कुटुंबापर्यंत संपर्क करणे.

६) या ज्ञान केंद्राचे पुढे चालुन माहिती सुविधा केंद्रात रुपांतर होइल व तिथे संस्थेचा खर्च भागवण्यासाठी काही व्यावसायीक कामे केली जातील, (उदा. ग्रंथालय, पुस्तके अन शालेय साहित्य विक्री, शेतीची- नवीन उपकरणे, सोलर वा पर्यायी उर्जा उपकरणे, ई)

*** सध्याच्या सेट अप मध्ये यासाठी ५,००० रु. प्रति महिना खर्च येईल. तो मी स्वतः करणार आहे. त्यापुढे, संस्थेचे माहिती सुविधा केंद्र सुरु झाल्यावर खर्च त्यातुनच भागवला जाईल. ना नफा ना तोटा ह्या तत्वावर हे केंद्र चालवले जाईल.

*****************************************************

मायबोलीकरांच्या सुचनांचे स्वागत आहे!

चंपक, धन्यवाद.

पांढरकवडा आणि नागपुर येथे माझे काही मित्र एनजीओज मध्ये आहेत. त्यांना मी या बाफचा दुवा देतो आहे.

त्या २०० शाळांमधील २-४ होतकरु विद्यार्थी (प्रत्येकी) निवडुन त्यांना या कार्यक्रमात सहभागी केले तर काही गोष्टी जास्त सुलभ होतील.

आशिष,

नक्की!

सर्व शाळांना अन शेतकरी कुटुंबाना संपर्क करण्याचा उद्देशच हा आहे, कि त्यातुन काही विद्यार्थी, तरुण असे मिळतील कि ज्यांना थोडे बुस्ट केले कि ते त्यांचे उद्दिष्ट सहज गाठु शकतील. हा उपक्रम राबवताना असे कस्तुरीमृग शोधणे हा प्रयत्न निश्चितच राहिल. शहरात शिकणार्‍यांना कल्पना येउ शकणार नाही, पण पुणे-मुंबई इथे राहिलेला-शिकलेला शाळकरी मुलगा अन गावात राहिलेला शाळकरी मुलगा ह्याच्या माहिती मध्ये जमीन अस्मानचे अंतर असते. मी तरी ते किमान २५ वर्षे आहे असे मानतो...

एक साधे उदा. एम एस्सी ला प्रवेश घ्यायला पुण्यात केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या फेरीसाठी आलो असताना आम्हा मित्रांना कळले कि पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात एम एस्सी करायला वेगळी प्रवेश परिक्षा द्यावी लागले, फक्त बी एस सी चे मार्क तिथे मोजले जात नाहीत (दोन्ही ला ५०-५० वेटेज देउन गुणवत्ता यादी तयार करतात). अन आमच्यातील दोन हुषार मुलांना शेवटी जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. गुणवत्ता असुनही त्यांना तिथे संधी मिळु शकली नाही, कारण अशी काही प्रवेश परिक्षा असते हेच आम्हाला माहिती नव्हते! मग पुणे विद्यापीठ विभागप्रमुख अन आमचे प्राचार्य ह्यांना कल्पना दिली अन पुढील वर्षापासुन प्रत्येक महाविद्यालयाला प्रवेश परिक्षेची माहिती पाठवली जाउ लागली.
*************

पुढे चालुन ह्या माहिती सुविधा केंद्राला शासकीय सामाजीक कार्यक्रमांची 'नोडल एजन्सी' म्हणुन मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तो दुरचा टप्पा आहे. सध्या संस्था नोंदणी करायला अर्ज केला आहे (नोव्हेंबर २००९). पहिली फेरी झाली आहे (जनेवारी २०१०), पुढील फेरीनंतर नोंदणी प्रमाणपत्र मिळेल.(मार्च-एप्रिल २०१०)

*************

दोन मायबोलीकर, फ आणि कुल ह्यांनी ह्या उपक्रमाला सक्रिय सहकार्य देउ केले आहे. धन्यवाद!

फ माहितीपत्रकांमधील मजकुरांसंबंधी अन संपादनांसंबंधातील मदत करणार आहे. तर कुल आमच्याच तालुक्यातील असल्याने प्रत्यक्ष फिल्ड वर मदत करेल.

ह्या उपक्रमाला अनेक शुभेच्छा.
थोडेसे विषयांतर वाटेल पण शहरातल्या शिक्षणाचा दर्जा ,अनेक योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचायला खुप वेळ लागतो त्यामानाने गुटखा,कोककोला ह्या गोष्टी मात्र खुप लवकर पोहचतात. गदचिरोलीसरख्या दुर्गम भागात दरवर्षी जवळपास ७५-८० कोतीचा गुटखा खपतो.त्या लोकांची तळागाळात पोहोचण्याची modus operandi काय असते हे नीट जाणुन घेतले तर त्याचा उप्योग चांगल्या गोष्टी पोहचवण्यासाठीपण होउ शकेल.

धन्यवाद ! अर्क च्या सुचनेचा गंभीरपणे विचार करत आहे. कुठल्याही कल्पनेची व्यवहार्यता हाच केंद्रबिंदु मानुन ती पुढे मांडली गेली पाहिजे, मग तिला अनुयायी मिळतातच!

ऑस्ट्रेलियातील भारतीय दुतावासाने एक नवीन 'ग्यान' प्रकल्प सुरु केला आहे.

http://hcindia-au.org/gyan_index.html

'मेंबर' लिस्ट मध्ये गेले कि नावे अन प्रोफाईल बघायला मिळतील.

मी त्यात नाव नोंदवले आहेच! Happy