मायबोलीकरांच्या व्यक्तिगत लेखनाची यादी आणि सुचवलेले लेखन (हे पण पहा)
१)प्रत्येक मायबोलीकराने केलेले लेखन त्यांच्या व्यक्तिरेखेत जाऊन पहायची सोय नेहमीच होती. पण त्या पानाची मांडणी बरेच लेखन असेल तर शोधायला तितकीशी सुलभ नव्हती. प्रत्येक लेखनाचा थोडा भाग दिसायचा पण हवे ते लेखन शोधण्यासाठी बरेच आत जावे लागायचे. बर्याच मायबोलीकरांनी आपआपल्या विचारपूस पानाच्यावर वेगळी यादी ठेवायला सुरुवात केली.
आजपासून या यादीच्या मांडणीत बदल केला आहे. नवीन लेखनात ज्याप्रमाणे थोडक्यात शीर्षक आणि लेखन प्रकार दिसतो, तश्याच प्रकारे तुमच्या व्यक्तिरेखेबरोबरच्या "लेखन" या टॅबमधे ही यादी दिसेल. या आपोआप होणार्या यादीमुळे विचारपूस पानाच्यावर वेगळी यादी ठेवायची गरज नाही.