काळ्याकभिन्न दगडांच्या फ़टीतून
जसा कोवळा कोंब बाहेर येतो
स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी,
अगदी तसंच मनाच्या कपारीतून
शब्दांचा हिरवागार कोंब डोकावतो
त्याची तगमग थांबवण्यासाठी....
बघता बघता झाकून जाते संपुर्ण कपार
इवल्या इवल्या रोपट्यांनी
आणि पालटतो मनाचा ऋतू
वाहू लागतात भावनांचे वारे
बहरू लागते काव्याचे रान
ओली होते मुळांजवळची माती
पाऊस असला तरीही आणि नसला तरीही.....
-- संतोष वाटपाडे
"क्या दगडूशेट, सुबह सुबह लॉलीपॉप.."
ह्यॅं ह्यॅं ह्यॅं अंड्या, तू नाही सुधारणार बघ बोलत दगडूने शेवटचा झुरका मारत दातात खोचलेल्या बिडीचे थोटूक रस्त्याकडेच्या गटारात फेकले आणि अण्णाला कटींगचा आवाज देतच आमच्या दुकानात एंट्री मारली.
माझ्या अंगणात मोगर्याचे झाड आहे त्याला फुले आली नाही म्हणुन मित्राला विचारले तर गेल्या ३/४ दिवसात अचानक तो असा बहरला. माझा कॅमेरा अगदीच साधा असल्याने प्रचि असे आलेत. गोड माना.
मोगरा फुलला मोगरा फुलला ।
फुलें वेंचितां बहरू कळियांसी आला ॥१॥
इवलेंसे रोप लाविलें द्वारी ।
त्याचा वेलु गेला गगनावेरी ॥२॥
मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बाप रखुमादेविवरी विठ्ठलें अर्पिला ॥३॥


![]()