क्ले वर्क

स्पर्धेकरता नसलेले तों. पा. सु. - कपकेक्स, डोनट्स, कॅन्डीज - लारा (मामी)

Submitted by मामी on 23 September, 2012 - 11:34

हे स्पर्धेसाठी नाही, बालविभागातला उपक्रम आहे.

मला माहित आहे की या स्पर्धेत केवळ १२ वर्षानंतरची मुलंच सहभागी होऊ शकतात. मी हे लेकीला (वय वर्षं पावणेदहा) समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. पण तिला ते अजिबात पटलं नाही. 'तुम्ही सगळे mean आहात.' असं लेबल आपल्याला लावण्यात आलं. शेवटी मी तिला कबुल केल्याप्रमाणे तिनं केलेले क्लेचे कपकेक्स इथे टाकत आहेत. हे स्पर्धेत धरण्यात येणार नाहीत याची पूर्ण कल्पना आहे. Happy

विषय: 

माती आणि गणपती

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची ? कसं काय करायचं ? किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला? भाजायच्या कश्या ? कुठे ? एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.

Subscribe to RSS - क्ले वर्क