इज ऑफ डुइन्ग बिझनेस !
नमस्कार!
गेली तीन वर्ष सातत्याने शेती, शेतकरी आणि कृषी प्रक्रिया उद्योग या विषयावर स्वतः फिल्डवर काम करत आहे. या कामासाठी येणाऱ्या शासकीय, सामाजिक आणि राजकीय अडचणी समजावून घेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कुठलाही उद्योग उभारायचा म्हणजे अडचणी या येणारच! भारतासारख्या अतिशय क्लिष्ट रचनेच्या देशामध्ये नियमांच्या जंजाळात अडकून नवीन उद्योजकाचा गळफास बसून मृत्यू व्हावा अशी परिस्थितीवर आहे. आम्ही सारे अभिमन्यू अशा प्रकारची अवस्था उद्योजकांची झालेली असते. यातील जे लोक चक्रव्युव्ह भेदून बाहेर पडतील, ते मग यशस्वी उद्योजक म्हणून समाजात वावरताना दिसतात. त्यांचे अभिनंदन !