इज ऑफ डुइन्ग बिझनेस !

Submitted by चंपक on 29 March, 2023 - 04:58

नमस्कार!

गेली तीन वर्ष सातत्याने शेती, शेतकरी आणि कृषी प्रक्रिया उद्योग या विषयावर स्वतः फिल्डवर काम करत आहे. या कामासाठी येणाऱ्या शासकीय, सामाजिक आणि राजकीय अडचणी समजावून घेण्याचा आणि सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कुठलाही उद्योग उभारायचा म्हणजे अडचणी या येणारच! भारतासारख्या अतिशय क्लिष्ट रचनेच्या देशामध्ये नियमांच्या जंजाळात अडकून नवीन उद्योजकाचा गळफास बसून मृत्यू व्हावा अशी परिस्थितीवर आहे. आम्ही सारे अभिमन्यू अशा प्रकारची अवस्था उद्योजकांची झालेली असते. यातील जे लोक चक्रव्युव्ह भेदून बाहेर पडतील, ते मग यशस्वी उद्योजक म्हणून समाजात वावरताना दिसतात. त्यांचे अभिनंदन !

मी शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या निमित्ताने परदेशात राहिलो. त्यामुळे परदेशात असणारे उद्योग जगत फारसे अनुभवायला मिळाले नाही. परंतु जगभर विखुरलेल्या (पसरलेल्या नाही Happy ) मायबोलीकरांचे शासन, प्रशासन, आर्थिक संस्था यांचे काय अनुभव आहेत? तेथे कोणत्या चांगल्या प्रक्रिया आणि धोरणे राबवल्या जातात? की ज्या पुढे चालून भारतामध्ये राबवल्या जाऊ शकतील, याबद्दल चर्चा व्हावी, विचारांचे आदान-प्रदान व्हावे, या हेतूने हा धागा सुरू करत आहे!

उद्योग करण्याची सुसह्यता . . . इज ऑफ डुइंग बिझनेस!

सर्वांचे सहकार्य अपेक्षित !

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वाह! फिलगुडचा धागापण आला का? आताच तिकडे प्रतिसाद देऊन आले.
तुम्हाला अपेक्षित सहकार्य मी करु शकत नाही परंतू तुमचा हा उद्योग भरपूर यशस्वी होवो हि शुभेच्छा.
आय विश,लवकरच फिलगुड गुळ आम्हाला ठाण्यात (आणि जगभरातही) सर्रास उपलब्ध होवो.
congratulations & best of luck