marathi poem

तिच्या समोरील पाने

Submitted by प्रतिक सोमवंशी on 23 June, 2019 - 11:35

काल मी तिच्यासमोर ठेवून दिली
मी लिहिलेली काही पाने
मागच्या काही महिन्यात लिहिलेली
तिच्या ओठांवर लिहिलेल्या चारोळ्या
तिच्या पाठीवर लिहिलेल्या कविता
अन तिच्यावर लिहिलेल्या गजला
तिच्या केसांत गुंफलेली त्रिवेणीही होतीच
त्या फक्त ओळी नव्हत्या , प्रत्येक ओळ ती स्वतः होती
कशीही का असेना पण माझी होती
कित्येक मैफिली गाजवल्या होत्या मी
त्या ओळींवर, तिच्या जीवावर
तिने पान उचलले, ती वाचू लागली
माझी नजर तिचे भाव टिपू लागली
तिने हळूच एक भुवई वरती केली
एक उसासा टाकला,
पान खाली ठेवून दिल

काळ अनंत आहे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 22 June, 2019 - 08:01

बघ कुठेतरी काहीतरी राहून गेलय...
एक एक क्षण हातातून निसटून जातोय...
तुझाही प्रवास असाच सगळ्यांसारखा...
अनंताकडून अनंताकडे...
काय कमावलस? काय गमावलस?
याच्या हिशोबात पडू नकोस...
तुझ गणित अजूनही कच्चच आहे...
बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार,
इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रीग्नोमेट्री,
क्वांटम फिजिक्स, सेलेस्टीअल मेकॅनिक्स,
कॉस्मोलॉजि, अस्ट्रोलॉजि,
न्यूटनचे, डार्विनचे, पायथागोरसचे कोणतेही सिद्धांत लावलेस तरी...
शेवटी ‛शून्य’च उरणार...
वरच्या शंकूतील वाळू खालच्या शंकूत
अशीच हळू हळू निसटत जाणार...
.

सांग ना गेलीस तू कुठे?

Submitted by रेणुका१२३ on 8 January, 2016 - 05:24

माझिया मनाचिया उंबरी
तुझी सावली अजून आहे
तो सूर्य अजूनही आहे
पण सांग ना गेलीस तू कुठे?

कैसा हा तू केलास घात
कोवळ्या मनावर आघात
अर्ध्यावाटेत सोडूनिया हात
अशी सांग ना गेलीस तू कुठे?

वाट पाहतो अजूनही दारात
तुला शोधतो अजूनही घरात
भयाण शांतता छळते मनात
सखे, सांग ना गेलीस तू कुठे?

एकदा परतुनी मजकडे ये
घट्ट तुझ्या मिठीत घे
चुका माझ्या उदरात घे
तुजवीण सांग ना मी जाऊ कुठे?

- रेणुका

शब्दखुणा: 

दु:ख़

Submitted by अतुल. on 24 May, 2011 - 12:31

टांगेवाला बाबू भारी कणखर, उमर साठीची सफेदी डोईवर
तसाच वेषही साधा खरोखर, अंगी सदरा अन पायी धोतर

टांगा त्याचा हो फिरे चहूकडे, 'सुदामा' त्याचे उमदे घोडे
हाती मग तो लगाम पकडे, सोडी तो त्याला जो जाईल जिकडे

बाबूचे जगणे कष्टाचे भारी, टाकूनी एका मुलाला पदरी
अर्धांगीनी गेलेली देवाघरी, एकटा बाबू परी जीव 'बबन्या'वरी

पण काळाने उलटा डाव टाकला, हसता खेळता पोर आजारी पडला
अन एक दिवस काळाच उगवला, बाबूचा 'बबन्या' देवाघरी गेला

बाबू हतबल झाला सैरभैर, तीळ तीळ तुटला बाप तो कणख़र
आसवांना नयनी ना खळ, बाबू झाला अस्थि-पंजर

दु:ख़ी बाबूचे दु:ख़च न्यारे, ना साथी ना सगे सोयरे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - marathi poem