खेळ प्रीतीचा
खेळ प्रीतीचा
तुझ्या माझ्या प्रीतीचा , खेळ असा रंगला
रातराणीचा गंध, बेधुंद जीव कसा दरवळला
सुमनांचे बाहुपाश , करीती दोघा वश
लाघवी सहवास , सहजी कैद झाला
बघ कसे फुलले असे, श्वास चांदण्यांचे
थेंब अमृताचा, अतृप्त अधरी साकाळला
सूर प्रीतीचा अबोल , अंतरात खोल, खोल
तन मन झंकारुन , नादब्रम्ह जाहला
लुटले मी तुला अन लुटले तू मला
तरीही अजून कसा , मरंद न सरला
फुटे तांबडे तरीही , चंद्र बघ फेसाळला
मंद मंद सुंगधित , पहाट वातही धुंदला