Submitted by दत्तात्रय साळुंके on 3 October, 2017 - 00:51
खेळ प्रीतीचा
तुझ्या माझ्या प्रीतीचा , खेळ असा रंगला
रातराणीचा गंध, बेधुंद जीव कसा दरवळला
सुमनांचे बाहुपाश , करीती दोघा वश
लाघवी सहवास , सहजी कैद झाला
बघ कसे फुलले असे, श्वास चांदण्यांचे
थेंब अमृताचा, अतृप्त अधरी साकाळला
सूर प्रीतीचा अबोल , अंतरात खोल, खोल
तन मन झंकारुन , नादब्रम्ह जाहला
लुटले मी तुला अन लुटले तू मला
तरीही अजून कसा , मरंद न सरला
फुटे तांबडे तरीही , चंद्र बघ फेसाळला
मंद मंद सुंगधित , पहाट वातही धुंदला
कोणाची ना हारजीत , जिंकेल इथे फक्त प्रीत
जळावर यमुनेच्याही , तरंग बघ उठला
तुझ्या माझ्या प्रीतीचा खेळ असा रंगला
रातराणीचा गंध, बेधुंद जीव कसा दरवळला
दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शब्दनशब्द एकदम जबरदस्त
शब्दनशब्द एकदम जबरदस्त
खुप छान लिहिलंय
व्वा अप्रतिम!!
व्वा अप्रतिम!!
अप्रतिम, खुप छान. आवडली
अप्रतिम, खुप छान.
आवडली
खूपच सुंदर!!!!
खूपच सुंदर!!!!
टायटल पण छान...
अंबज्ञ आपल्या मनस्वी
अंबज्ञ आपल्या मनस्वी प्रतिसादासाठी खूप, खूप धन्यवाद
मेघाजी काव्य आणि शीर्षक आवडले
मेघाजी काव्य आणि शीर्षक आवडले खूप आभार !
अक्षयजी , VB आपल्या उत्साहवर्धक प्रतिसादासाठी खूप धन्यवाद !
वॉव, फुल टू रोमँटिक....
वॉव, फुल टू रोमँटिक....
शशांकजी उस्फूर्त
शशांकजी उस्फूर्त प्रतिसादासाठी खूप धन्यवाद !