खार बाई खार
खार बाई खार नाजूकनार
शेपूट सुंदर झुबके दार
खार बाई खार भित्री फार
पाऊल वाजता झाली पसार
खार बाई खार चपळ फार
क्षणात होते नजरे पार.
मुलगी लहान असताना एक अडगुल मडगुल नावाची सिडी आणली होती त्यात हे एक बालगीत होत. आमच्या भागात खारूताई खुप आहेत पण अगदी गाण्याप्रमाणेच. इकडून तिकडे धावणार्या, आपल्या झुबकेदार शेपटीला झळकावणार्या आणि इतक्या चतूर की कॅमेरा आणे पर्यंत गायब होतात. तसाच काही फोटो ह्यांचा पिच्छा करून तर काही फोटो ह्या निवांत असताना काढलेले.
१) नमस्कार.