खार बाई खार

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 January, 2016 - 05:12

खार बाई खार नाजूकनार
शेपूट सुंदर झुबके दार

खार बाई खार भित्री फार
पाऊल वाजता झाली पसार

खार बाई खार चपळ फार
क्षणात होते नजरे पार.

मुलगी लहान असताना एक अडगुल मडगुल नावाची सिडी आणली होती त्यात हे एक बालगीत होत. आमच्या भागात खारूताई खुप आहेत पण अगदी गाण्याप्रमाणेच. इकडून तिकडे धावणार्‍या, आपल्या झुबकेदार शेपटीला झळकावणार्‍या आणि इतक्या चतूर की कॅमेरा आणे पर्यंत गायब होतात. तसाच काही फोटो ह्यांचा पिच्छा करून तर काही फोटो ह्या निवांत असताना काढलेले.
१) नमस्कार.

२) खाली काय गेल?

३) अरे आता त्या बाजूला

४) काय बाई कसरतच करावी लागते.

५) धड बसू देत नाही.

६) आता पडेन मी

७) वाचले बाबा.

८) माझ ला़डक शेपूट

९)

१०) किती वजनदार झालय शेपूट.

११) ही माझी मैत्रीण बर का!

१२) कुकीक

१३) अग बाई$$$ सगळी कडे ओलंच ओलं.

१४) पाय ठेवायलाही जागा नाही.

१५) हा पुल बरा आहे.

१६) कधी जाणार हे पाणी????

१७) आमच कधी पटतच नाही बुवा.

१८) गेले खाली. आहो $$$$

१९) बघा ना किती उदास झाले मी.

२०) आहे की नाही मी सुंदर !

२१) तुमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळूदे. टाटा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला, जागुले तुला भरपुर्र उम्मा उम्मा!:इश्श: खार हा प्राणी माझा प्रचन्ड आवडता. त्यात तू तिचे फोटो टाकुन भर घातलीस.:स्मित: तुझ्या कॅप्शन्स पण लय भारीयेत आणी खारुटलीचे फोटो आणी तिचे लाडीक विभ्रम पण लय गोड.

Lol छान!

वॉव जागुले .. मस्त पकडलेस प्रत्येक क्षण..तेरी मॉडेल भी भारीये.. आणी कॅप्शन्स अगदी अ‍ॅप्ट!!!

मस्त!!!!

रश्मी Lol

शशांकदा, बी, मऊ, जयु, विजय, वर्षूताई, शोभा, दिनेशदा, गजानन, बाजिंदा, निरू, देवकी धन्यवाद.

बाजिंदा असणारच त्यांना फिलिंग फक्त त्यांचे स्वरूप वेगळे असेल.

खरोखर मज्जा आली फोटो पाहताना!!! Happy

आधी ती खार बाई खार हे शिर्षक खारवलेल्या माश्यांचे असेल असे वाटलेले! Wink

फोटो कॅप्शन नेहमीसारखेच मस्त,
गेले खाली. आहो $$$$ >> हे भारी जमलेय Lol

थोड विषयांतर - जर तुम्हाला $$ याच्या जागी ऽऽ हे वापरायचे असेल तर माझ्या नावातून घेऊ शकता Happy

थोडं विषयावर - आमच्या बिल्डींगमध्ये एकाने खार पाळली होती. २४ पैकी २२ तास एका खोक्यात ठेवायचे. मी एवढा निष्पाप जीवांची हत्या करणारा पण मलाही तिचे वाईट वाटायचे. एके दिवशी तिने सुटकेचा मार्ग स्वत:च शोधला. खिडकीतून उडी घेतली.
घाबरू नका. ते दुसर्‍या माळ्यावर राहायचे, ती पहिल्या समोरच्या टेरेसवर पडली. आणि हे वेडे लोकं वाट बघत बसले की मांजरीला कुठेही सोडले तरी परत येते तसे ही सुद्धा परत येईल.

आमच्या बिल्डींगमध्ये एकाने खार पाळली होती. २४ पैकी २२ तास एका खोक्यात ठेवायचे. मी एवढा निष्पाप जीवांची हत्या करणारा पण मलाही तिचे वाईट वाटायचे.

>> आमच्याकडे देखील २ पाळलेल्या खारी आहेत आणि त्यांनी पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हापासुन आमच्याचकडे आहेत. पिंजरा कितीही वेळ उघडा ठेवला तरी बाहेर जात नाहीत. त्यांना मांजराने वगैरे खाऊ नये म्हणून पिंजरा बंद ठेवावा लागतो.

अवांतरः त्यांचे ड्रॉपरने दुध पितांनाचे लहानपणीचे फोटोज फार क्युट आहेत. मला इथे फोटो टाकता येत नाहीत. कोणी टाकणार असेल तर व्हॉ.अ‍ॅप करते. Happy