********************************************************
आपल्या आयुष्यातल्या नात्यांचा पहिला गोफ विणला जातो तो आई, वडिलांसोबत. या सुंदर तिहेरी गोफात गुंफलेल्या असतात असंख्य आठवणी. हीच शिदोरी आपल्याला पुढे हसवते, रडवते, घडवते, सांभाळते आणि आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरते.
आईचं स्थान अबाधित आहेच पण वडिलांशी असलेलं नातंही खास असतं, नाही का? प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हे नातं आपल्या आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवलेलं असतं.
लहान मुलांच्या, म्हणजे वय वर्षे ४ ते १० या वयोगटातल्या मुलांच्या, खाण्याच्या सवयी, आवडी निवडी इ इ बद्दल इथे लिहा. माझ्यासारख्या बर्याच पालकांना खुप मदत होइल.
मुलांच्या खाण्याच्या आवडी निवडी इथे या विषयावर थोडी चर्चा झाली आहे, पण ते 'गप्पांचे पान' आहे त्यामुळे चर्चा वाहुन जाईल.
धन्यवाद
"आई गं, कंटाळा आलाय घरात बसुन... बाहेर जाऊ का खेळायला??"
"अजिब्बात नाही... रणरणत्या उन्हात बाहेर जायचं नाही... जा पुस्तक वाच, नाहीतर टीव्ही बघ थोडावेळं"
वार्षीक परीक्षा संपुन उन्हाळ्याची सुट्टी लागली की घरोघरी होणारा हा आई आणि मुलांमधला कॉमन संवाद. बच्चे कंपनीला स्पेशली लहान मुलांना सुट्टीत बिझी कसे ठेवायचे हा आई-वडिलांना नेहमी पडलेला प्रश्न. सध्या माझ्याही लेकीला टर्म एंड म्हणुन २ आठवडे सुट्टी आहे. त्यामुळे तिला बिझी ठेवणे हे माझ्यापुढेही एक चॅलेंजच आहे.
वय वाढत तस मुलांचे प्रश्न पण वाढत जातात आणि जास्त प्रगल्भ होत जातात. जेव्हा बाहुल्यांबरोबर खेळणारी चिमुरडी विचार करायला लावणारे प्रश्न विचारते तेव्हा पालक होण्याची जबाबदारी फक्त मोठीच नाही तर कठीण वाटायला लागते.