कधी
कधी वाटतं...
कधी वाटतं संध्याकाळचा मंद वारा बनून तुझ्या श्वासात सामावून जावं...
कधी वाटतं सकाळचं कोवळं उन बनून तुला अलगद स्पर्श करुन पहावं....
कधी वाटतं पावसाच्या सरी बनून तुझ्यावर मनसोक्त बरसावं...
कधी वाटतं चंद्र बनून खिडकीतून तुला पाहण्यासाठी तरसावं...
कधी वाटतं एखादं सुंदर फुल बनावं आणि तु अलगद मला तोडावं...
मग मीही तोडण्याच्या वेदना विसरून तुझ्याशी सुगंधाने नातं जोडावं...
कधी वाटतं मावळत्या सुर्याचे रंग बनून तुझी सायंकाळ रंगवून टाकावी...
कधी तुझ्या डोळ्याची नाजुक पापणी बनून तुझी सुंदर स्वप्ने झाकावी...
नव्हतास कधी तू जेव्हा...
वादळ अंतरीचे
वादळ अंतरीचे क्षमायचे कधी
नशिबास खेचुनी आणायचे कधी
विसरुन वेदना हसुन घे जरा
आयुष्य उरलेले जगायचे कधी
एकाच वाटेने जाऊ नको गडे
वाटा अनेक येथे चालायचे कधी
रेशीम गाठी अशा उधडु नये सखे
नेसुनी वस्त्र भरजरी मिरवायचे कधी
झुगारुन सावलीला बाहेर ये जरा
आधार वास्तवाचा व्हायचे कधी
झोपु नकोस वेडे प्रत्येक रात्रीला
माळुनी ता-यास मग झिंगायचे कधी
कल्पी जोशी
१९/०२/२०१०